विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीमे अंतर्गत आयोजन
गुहागर, ता. 07 : तालूक्यातील मळण ग्रामपंचायतीच्या वतीने कूंभारवाडी सभागृह येथे रथ यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमात रथामधील टेली स्क्रिनच्या माध्यमातुन उपस्थित ग्रामस्थांना देशामधील विविध भागातील शासनामार्फत झालेल्या विकास कामांचे आणि शासकीय योजनांचे थेट दर्शन चित्र फित द्वारे दाखविणेत आले. Guidance on government schemes at Malan


या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहीती ग्रामस्थांना दिली. त्यामध्ये आधारकार्ड लींक करणे, जिवन विमा कार्ड, गॅस कनेक्शन घेणे अशा विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन करणेत आले. Guidance on government schemes at Malan
या कार्यक्रमात नविनच विकसीत झालेले कृषि फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक कृषि अधिकारी यांनी दाखविले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरप़ंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाटी, आशा सेवीका, अंगणवाडी सेवीका, मदतनीस, कृषि अधिकारी, एच पी गॅस वितरक, प्रमूख अंगणवाडी सुपरवायझर, महिला बचत गट, सर्व सदस्य, वाडी प्रमूख, पत्रकार आणि ग्रामस्थ बंधु भगिनी बहू संख्येने उपस्थित होते. Guidance on government schemes at Malan