गुहागर, ता. 19 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये रिगल कॉलेज चिपळूण तर्फे जेईई व नीट परीक्षांबद्दल मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराला गुहागर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. Guidance Camp at Shringaratali Regal College
या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोटा पॅटर्नचे पंधरा वर्षांहून अधिक अनुभव असलेले प्रा. श्री. नारायण सिंग उपस्थित होते. त्यांनी जेईई व नीट या परीक्षांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. जेईई व नीट परीक्षा म्हणजे काय, या परीक्षेची उत्तरे कशी सोडवावी, या परीक्षेसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, या परीक्षेसाठी पेपर पॅटर्न कसा असतो, या परीक्षेला गुण कशाप्रकारे दिले जातात, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन केले. Guidance Camp at Shringaratali Regal College
रिगल कॉलेज कोंढे चिपळूण येथे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमासोबत जेईई व नीट परीक्षांची तयारी करून घेतली जाते. यासाठी तज्ञ निवासी प्राध्यापक वर्ग तेथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दि. 7 जानेवारी रोजी रिगल कॉलेज शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षांमध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची सुविधा रिगल कॉलेज मार्फत देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन उत्तम डॉक्टर व इंजिनियर बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. सौ सुमिता शिर्के यांनी केले. Guidance Camp at Shringaratali Regal College
या शिबिरासाठी रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के, प्रा. नारायण सिंग, रिगल कॉलेज चिपळूणचे समन्वयक श्री. मुल्लाजी, रिगल कॉलेजच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे, रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. Guidance Camp at Shringaratali Regal College