मयूरेश पाटणकर, गुहागर
Guhagar news : गेली चार वर्ष गुहागरात होणाऱा व्याडेश्र्वर महोत्सव कलाकारांना, व्यावसायिकांना, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटक व्यवसायाला मदत करणारा ठरत आहे. कोणत्याही स्वरुपातून उत्पन्न वाढीचे लक्ष्य न ठेवता परमेश्र्वराप्रमाणेच सढळ हाताने सर्वव्यापी मदत करणारा असा हा महोत्सव गुहागरच्या प्रगतीची दिशा ठरवणारा ठरला आहे. Guhagar Vyadeshwar Festival
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ
गेली चार वर्ष व्याडेश्र्वर महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमधुन स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते. महोत्सवाचा पहिला प्रयोग नमन महोत्सवाने झाला. मग त्यात शेतकरी नृत्य, जाखडी नृत्य, मंगळागौरीचे खेळ यांनी भर घातली. पुढे मैदानीचा खेळाचा प्रकार असलेल्या पालखीनृत्याचेही सादरीकरण झाले. यावर्षी थेट मल्लखांब, योगासने यांचे सादरीकरणही व्याडेश्र्वर महोत्सवात झाले. याशिवाय बेटी बचाव, स्वच्छता सामाजिक विषयांवर आधारीत नृत्याचे सादरीकरण झाले. तीन दिवसांत 26 संस्थांद्वारे 300 हून कलाकारांना महोत्सवातून व्यासपीठ मिळाले व मानधनही मिळाले. Guhagar Vyadeshwar Festival


तीन दिवसांसाठी 100 फूट लांब व 35 फूट रुंद व्यासपीठ, एक हजार लोक मावतील एवढा भव्य मंडप, त्याच्या बाजुला स्टॉल हे सर्व उभारणारा देखील गुहागरमधला व्यावसायिकच आहे. आता अन्य कोणतेही काम मी घेऊ शकतो हा आत्मविश्र्वास व्याडेश्र्वर देवस्थानने दिला. असे जयंत साटले अभिमानाने सांगतात. Guhagar Vyadeshwar Festival
महोत्सवातून रोजगाराची निर्मिती
तीन दिवस महोत्सवात महोत्सवाच्या बाजुने विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येतात. यावर्षी 22 खाद्यपदार्थांचे स्टॉल महोत्सवात होते. या स्टॉलधारकांकडून तीन दिवसांसाठी केवल 2100 रुपये घेतले जातात. हे शुल्क नाही तर स्टॉल उभारणी व तेथे पूर्ण वेळ दिलेल्या वीजजोडणीचे शुल्क असते. या नाममात्र भाड्यात दररोज 15 ते 25 हजारांहून अधिकचा व्यवसाय होतो. हा व्यवसाय नेहमीपेक्षा दुप्पट, तिप्पट असल्याचे स्टॉलधारक वैभव तांबे सांगतात. हे स्टॉल केवळ हॉटेल व्यावसायिकच लावत नाहीत तर घरी हौशीखातर विविध प्रकारच्या पाककला करणाऱ्या गृहिणींनाही येथे संधी दिली जाते. हॉटेल व्यवस्थापन शिकणारे विद्यार्थीही आपला स्टॉल लावतात. त्यातून त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचे शिक्षण मिळते. महोत्सवात सायंकाळपासून विक्री करण्यासाठीच्या खाद्यपदार्थांची स्वतंत्र तयारी करावी लागत असल्याने नेहमीच्या व्यवसायातील मनुष्यबळापेक्षा जास्त मनुष्यबळ स्टॉलधारकांना आवश्यक असते. त्यांना सहा दिवसांचा पगार द्यावा लागतो. महोत्सवातून रोजगाराची निर्मिती होतेच त्याचबरोबर नवीन उद्योजकही घडतात. Guhagar Vyadeshwar Festival


महोत्सवात आकाश पाळणा, नौका, विमान, झुकझुक गाडी, जम्पींग सर्कल, मिकीमाऊसची घसरगुंडी, नेमबाजी, थ्रीडी रेस असे खेळ असतात. गुहागर तालुक्यात असे खेळ उपलब्ध नसल्याने शनिवार, रविवारी तालुकावासीयही मुलांसोबत महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी येतात. या खेळांमधुन 15 कुटुंबांना रोजगार मिळतो. या व्यावसायिकांकडूनही देवस्थान देणगी घेत नाही तसेच तिकीटांचे दर मर्यादित रहातील याचीही काळजी घेते.


या महोत्सवाला आता काही पर्यटक दरवर्षी येऊ लागले आहेत. दिवसभर भटकंती करायची आणि रात्री महोत्सवात पोटोबा आणि सर्व प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद लुटायचा हा त्यांचा कार्यक्रम असतो. जे पर्यटक नव्याने येतात तेही पुढच्यावर्षी पुन्हा महोत्सवाच्या वेळीच गुहागरला येण्याची खूणगाठ बांधून जातात. यावरुन महोत्सवात पर्यटनाचे नाव नसेल तरी पर्यटनवाढीची दिशा देणारा महोत्सव अशी ओळखही होत आहे. Guhagar Vyadeshwar Festival
दरवर्षी महोत्सवात चांगले काम, वेगळे काम करणाऱ्यांचा सत्कार देवस्थान करते. याला गुहागर तालुक्याचे बंधन नाही. यावर्षी नासा, इस्रो या संस्थांमध्ये जाण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देवस्थानने केला. तसेच 40 एकर जागेत पक्षी अभयारण्य तयार करणाऱ्या मिरवणे, ता. चिपळूण येथील नंदु तांबे यांचाही सत्कार करुन त्यांचे कार्य लोकांसमोर ठेवले. यापर्वी पद्मश्री मिळालेले दादा इदाते, निवृत्त ॲडमिरल हेमंत भागवत, कासव संवर्धनाचे अभ्यास शास्त्रज्ञ सुरेशकुमार अशा दिग्गजांसोबत तालुक्यातील अनेकांचा सत्कार महोत्सवात व्याडेश्र्वर देवस्थानने केला आहे. त्यातून या मंडळींचे कार्य लोकांसमोर ठेवले आहे. म्हणूनच हा महोत्सव प्रगतीची दिशा ठरविणारा आहे असे म्हणावे लागते. Guhagar Vyadeshwar Festival


आम्ही कराडवरुन तीन ट्रक भरुन साहित्य घेवून 20 जणांच्या टीमसोबत इथे येतो. तीन दिवस व्यवसाय करतो. आमच्याकडून देवस्थान भाडे घेत नाहीच पण फुकट खेळांचा आनंद लुटण्याची विनंतीही ट्रस्टी करत नाहीत. व्याडेश्र्वरकृपेने भरपुर व्यवसाय होतो.- दिपक चव्हाण कराड, आकाश पाळणा व्यावसायिक