गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गुहागर तालुक्याचा 97.46 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result
गुहागर हायस्कुल
यामध्ये गुहागर हायस्कुलचा 98.70 टक्के निकाल लागला असून परीक्षेला बसलेल्या 231 विद्यार्थ्यांपैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शास्त्र शाखेत प्रथम कुमारी सिध्दी संदीप मुकनाक हिला 74 टक्के गुण, द्वितीय क्रमांक कुमारी श्रुती संतोष लवंदे 70.33 टक्के, तृतीय कुमारी सदबशा अब्दुल मुजावर 69.67 टक्के, वाणिज्य शाखेत प्रथम कुमारी श्रावणी विवेक कलझुनकर हिला 89.50 टक्के, द्वितीय क्रमांक तमसिल सलीम सरनोबद हिला 88 टक्के, तृतीय कुमारी अनिषा संजय कनसरे 82.67 टक्के, कला शाखेत प्रथम कुमार यश धोंडू म्हसकर याला 83.17 टक्के, द्वितीय क्रमांक श्रावणी संजय रांजणे 72.83 टक्के, तृतीय कुमारी सानिया श्रीधर जोगले 68 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. Guhagar taluka 12th result
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा 95.08 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत प्रथम तन्वी अनिल वेद्रे हिला 83 टक्के, द्वितीय मयुरी मनोहर गुरव 79.50 टक्के, तृतीय रेणुका सखाराम मुरमुरे 76.83 टक्के, वाणिज्य शाखेत प्रथम कुमारी आनंदित संजय आग्रे 83.50 टक्के, द्वितीय क्रमांक सायली शंकर घाणेकर 82.33 टक्के, तृतीय दीक्षा साळवी हिला 78 टक्के गुण मिळाले. Guhagar taluka 12th result


न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचा निकाल 96.61 टक्के लागला. यामध्ये कला शाखेत प्रथम अदिती अभिजित कुलकर्णी 95 टक्के, द्वितीय साहिल राजेंद्र मांडले 80.33 टक्के, तृतीय तन्वी संजय कुवळे हिला 76.17 टक्के, वाणिज्य शाखेत प्रथम वैष्णवी मुरारी साळवी 83.17 टक्के, द्वितीय अमृता दिलीप आंबेकर 78.83 टक्के, तृतीय साहिल राजेंद्र कानिटकर 77.83 टक्के, तर सायन्स शाखेत प्रथम तेजस्विनी अशोक मोहिते 73.17 टक्के, द्वितीय आश्लेषा सुनील घाणेकर 71.33 टक्के, तृतीय सिध्दी भूपेंद्र पटेल 71.17 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. Guhagar taluka 12th result
चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली
चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीचा 98.17 टक्के निकाल लागला. सायन्स शाखेत प्रथम सोहम प्रकाश गुरसले याला 85.05 टक्के, द्वितीय साक्षी नामदेव मेस्त्री 64.33 टक्के, तृतीय मंजिरी मधुकर जोशी 60 टक्के, कला शाखेत प्रथम युवराज संतोष पागडे 86.17 टक्के, द्वितीय अदिती गोपाळ हुमणे 86 टक्के, तृतीय नंदिनी अनंत जोशी 70.05 टक्के, तर वाणिज्य शाखेत प्रथम साहिल दिलीप जाधव 78.05 टक्के, द्वितीय तेजस्वी संतोष थोरसे 78.33 टक्के, तृतीय मयुरी मोहन कोकरे हिला 77.05 टक्के गुण मिळाले. तर तालुक्यातील पालशेतकर हायस्कूलचा 97.54 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result