आबलोलीचे श्रेयश विचारे, तन्वी मोरे, तर गुहागरची अनघा साटले तालुक्यात अव्वल
गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये गुहागर तालुक्याचा 99.51 टक्के निकाल लागला आहे. चंद्रकांत बाईत विद्यालयाचे विद्यार्थी श्रेयश विचारे, तन्वी मोरे व गुहागरच्या श्री देव गोपाळ कृष्ण विद्यामंदिराची विद्यार्थिनी अनघा साटले हे तालुक्यात अव्वल ठरले आहेत. Guhagar taluka 10th result
चंद्रकांत बाईत माद्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातील एकुण ५१ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यालयाने १०० टक्के निकालाची अनेक वर्षाची परंपरा कायम राखली आहे. कु. श्रेयस सतिश विचारे, कुमारी तन्वी अनिल मोरे यांनी प्रत्येकी ९८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कुमारी किमया दिनेश नेटके हिने ९५ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तर कुमारी वैष्णवी विकास मेस्त्री हिने ९४.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. आणि कुमारी श्रावणी महेश साळवी हिने ९३.४० टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक, तर कुमारी आर्या धनदिप साळवी हिने ९०.४० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत, कार्याध्यक्ष सचिन बाईत, मुख्याध्यापक डि. डी. गीरी यांचेसह शाळा व्यवस्थापन कमीटी पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विविध सामाजिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. Guhagar taluka 10th result


न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा सलग 14 वर्ष 100 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये श्रेया मंगेश साळवी हिला 94.40, पूजा तुळशीराम टाक हिला 91.40, स्वराज भोज घुटूकडे 89.80 टक्के गुण प्राप्त केले.
अंजनवेल येथिल दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विदयालायचा 84.80 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये नीरज संजय घरत 92.40, ओम पुंडलिक नाटेकर 89 टक्के, श्रद्धा प्रमोद चाळके 84.80 गुण प्राप्त झाले. Guhagar taluka 10th result
गुहागर श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. तर 90 टक्केवारीवरील 16 विध्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनघा अभय साटले हिला 96.40 टक्के, समर्था मंदार मिरे 96 टक्के, ओम दीपक देवकर 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले.
एक्सलंट अकॅडमी मिडीयम स्कूल आबलोली यांचा 100 टक्के निकाल लागला आहे. प्रथम रिद्धी प्रकाश मांडवकर 83.40, साहिल प्रदीप देसाई यांना 81 टक्के वेदांत पवार याला 75.29 टक्के गुण प्राप्त केले. Guhagar taluka 10th result
न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज पाटपन्हाळेचा 98.28 टक्के निकाल लागला आहे. श्रयशा नराळे हिला 96 टक्के, श्रीया पावसकर 95 टक्के, रिया धामणस्कर 89 टक्के गुण मिळवले.


शृंगारतळी येथील शृंगारी एज्युकेशन संचलित शृंगारी उर्दू हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. फरझीन सिराज घारे 93.40 टक्के, ज्यूबेरिया इम्रान पंछी 92.80 टक्के, उमेमा सर्फराज घारे हिला 92.40 टक्के गुण मिळाले.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा निकाल 100 टक्के लागला आहे. माही प्रकाश मयेकर 95.60 टक्के, पायल पंढरीनाथ धामणस्कर 90.60 टक्के, समीरा उमेश जोशी 89.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले. Guhagar taluka 10th result
आदर्श विद्यालय देवघरचा निकाल 95.65 टक्के लागला असून सेमी इंग्रजी माध्यममध्ये मानसी अजित सकपाळ 89.4 टक्के, समिधा सचिन चव्हाण 81 टक्के, तर अथर्व तुकाराम बाईत 75.6 टक्के निकाल लागला आहे.
मराठी माध्यम मध्ये प्रांजली बिपीन सोलकर, 78.20 टक्के, अमिष हरिश्चंद्र बोलाडे 65.80 टक्के, वेदांती विष्णू मांजरेकर हिला 64.60 टक्के गुण मिळवत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केले.
मा.ल.भा.हेदवकर विद्यानिकेतन हेदवी या प्रशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 87 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुरुची अभय भाटकर हिने 90.20 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. संजना अंकुश तांडेल हिने 88.20 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक, नंदन उज्वल वेल्हाळ याने 87.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. Guhagar taluka 10th result