गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ‘ या उपक्रमातर्गत घेण्यात येणाऱ्या नासा / इस्रो भेट निवड परीक्षेत गुहागर तालुक्यातून जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या शाळेचे 4 विद्यार्थ्यांची इस्रो ( बेंगलोर व श्रीहरिकोटा येथील अंतराळ संशोधन केंद्र ) दौऱ्यासाठी तर एका विद्यार्थ्यांची नासा ( अमेरिका, अंतराळ संशोधन केंद्र )दौऱ्यासाठी निवड झाली आहे. Guhagar school students will go for NASA / ISRO visit
गुहागर तालुक्यातून एकूण 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गुहागर नं. 1 या शाळेतील तब्बल 5 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 1) कु. सानवी संजय जांगळी, 2) कु. अभिनव मनोज शिंदे 3) कु. निर्विघ्न नकुल वायंगणकर 4) कु. कौशल सुहास धनावडे या विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी व कु. सोहम समीर बावधनकर याची नासा दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ही बाब गुहागर तालुका व शाळा गुहागर नं. 1 यांच्या अभिमानाची गोष्ट ठरली आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी इस्रो व नासा या अंतराळ संशोधन केंद्राना विमान प्रवासाने भेट देण्याचे भाग्य विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे मिळाले आहे. त्याबद्दल तालुकाभरातून विद्यार्थ्यांचे, शाळेचे व व्यवस्थापन समितीचे कौतुक होत आहे. Guhagar school students will go for NASA / ISRO visit


या विद्यार्थ्याना शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. नेहा मनोज जोगळेकर व फिरती विज्ञान प्रयोगशाळेचे मार्गदर्शक श्री. राजेंद्र खांडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यासाठी मुख्याध्यापक श्री. वसावे सर, सर्व शिक्षक वर्ग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. किशोरजी भागडे, स्थानिक प्राधिकरण सदस्या सौ. स्नेहाताई भागडे मॅडम तसेच गुहागर मधील शिक्षण प्रेमींकडून प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मान. श्री. गळवे साहेब, माजी गटशिक्षणाधिकारी मान. श्रीम. भागवत मॅडम, विस्तार अधिकारी श्री. लोहकरे साहेब व श्री. क्षीरसागर साहेब यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका सौ. नेहा जोगळेकर मॅडम यांचे विशेष अभिनंदन केले आहे. Guhagar school students will go for NASA / ISRO visit