भव्य ग्रुप डान्स स्पर्धा; लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानतर्फे आयोजन
गुहागर, ता. 13 : लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने गुहागर किनारा युवा महोत्सव 2025 साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जिल्हास्तरीय भव्य ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन रंगमंदिर गुहागर येथे करण्यात आले आहे. Guhagar Kinara Youth Festival
या जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 17 जानेवारी 2025 पर्यंत शुभम भायनाक, शुभम शेटे, अभिषेक भोसले, पुष्कर शिंदे यांच्याकडे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी केले आहे. Guhagar Kinara Youth Festival