तालुक्याचा निकाल 98.98 टक्के, कला शाखेची टक्केवारी घसरली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील 994 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते. मात्र त्यापैकी 990 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 980 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 98.98 टक्के लागला. बहुतेश कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र आणि वाणिज्य विभागाचा निकाल 100 टक्के लागला. मात्र कला विभागाचा एकूणच निकाल कमी लागला आहे. प्रत्येक शाळेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर नजर टाकली तर कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरल्याचे समोर येत आहे. Guhagar HSC Result
विज्ञान शाखेत आबलोली हायस्कुलच्या ज्ञानदा दिपक संज्योत रेपाळ या विद्यार्थ्यानीने 83.67 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेत शृंगारी उर्दु हायस्कुलच्या सामिया मुस्तफा साल्हे या विद्यार्थ्यानीने 88.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कला शाखेत पाटपन्हाळे हायस्कुलच्या सिध्दी रमेश सोलकर या विद्यार्थीने 78.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Guhagar HSC Result
गुहागर हायस्कुल
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर चा एकूण निकाल 98.92 टक्के लागला. 279 विद्यार्थ्यांपैकी 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शास्त्र आणि वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. तर कला शाखेचा निकाल 88.88 टक्के लागला.
गुहागर हायस्कुलच्या शास्त्र शाखेत 148 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्त्त्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक सेजल चंद्रकांत गोरीवले (77.67 टक्के), द्वितीय – साजिद अहमद साफी केळकर (74.83), तृतीय -नवदिप संतोष गमरे (74.5) या विद्यार्थ्यांनी मिळवला.
वाणिज्य शाखेत 104 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऋतुजा विठ्ठल अवेरे (86.67 टक्के) प्रथम, रिध्दी उदय धावडे (84.05) द्वितीय तर सेजल मनोजकुमार भेकरे (83.33 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला.
गुहागर हायस्कुलच्या कला शाखेतील 27 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले त्यापैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये आर्या मनोज पाटील या विद्यार्थीने 68.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. महादेव राजेश शिंदे (61.67 टक्के) द्वितीय तर सोनाली बाळकृष्ण कदम (56.05) ही विद्यार्थी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. Guhagar HSC Result
पालशेत हायस्कुल
श्रीम. रखमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतचा निकाल 99.15 टक्के लागला. 118 विद्यार्थ्यांपैकी 117 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शास्त्र आणि वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. तर कला शाखेचा निकाल 95.65 टक्के लागला.
पालशेत हायस्कुलमधील शास्त्र शाखेत 48 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्त्त्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी शेखर गुरव (63.50 टक्के), द्वितीय – सुरज नितेश बरागडे (63.33) व तृतीय क्रमांक आयुष दिपक वाडावे व सानिया सुधीर कनगुटकर (62.67) या विद्यार्थ्यांनी मिळवला. वाणिज्य शाखेत 47 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भाविका कृष्णा आंबेकर (77.17 टक्के) प्रथम, दिक्षा कृष्णा गावणंक (75.17) द्वितीय तर विक्रांत विजय भोसले (74.33 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला.
पालशेत हायस्कुलच्या कला शाखेतील 23 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले त्यापैकी 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रगती गजानन डिंगणकर या विद्यार्थीने 64.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रतिक्षा अमित मास्कर (51.50 टक्के) द्वितीय तर संचिता प्रभाकर मोरे (51.17) ही विद्यार्थी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
पालशेत हायस्कुलच्या व्होकेशनल विभागात प्रथम क्रमांक रुद्राक्षनाथ पंढरीनाथ बिर्जे (65.33), द्वितीय पूर्वजा संदेश पाटील (63.50), तृतीय क्रमांक समिप दत्ताराम हळ्ये (63.17) या विद्यार्थ्यांनी मिळवला. Guhagar HSC Result
पाटपन्हाळे हायस्कुल
न्यु इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.99 टक्के लागला. 297 विद्यार्थ्यांपैकी 294 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शास्त्र आणि वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. तर कला शाखेचा निकाल 97.09 टक्के लागला.
पाटपन्हाळे हायस्कुलमधील शास्त्र शाखेत 68 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्त्त्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक रिया रघुनाथ बैकर (78.50 टक्के), द्वितीय – श्रावणी सुजीत गमरे (70.33) व तृतीय क्रमांक सोनाली संजय सकपाळ (69.67) या विद्यार्थ्यांनी मिळवला.
वाणिज्य शाखेत 126 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जान्हवी प्रफ्फुल विचारे (87 टक्के) प्रथम, शिवम सुधाकर सकपाळ (81 टक्के) व भुमिका प्रशांत गमरे (81 टक्के) द्वितीय तर साक्षी विजय पवार (80.67 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला.
पाटपन्हाळे हायस्कुलच्या कला शाखेतील 103 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले त्यापैकी 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सिध्दी रमेश सोलकर या विद्यार्थीने 78.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. रिध्दी रमेश सोलकर (77.17 टक्के) द्वितीय तर श्रावणी प्रशांत जाधव (76.83) ही विद्यार्थीनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. Guhagar HSC Result
तळवली हायस्कुल
न्यु इंग्लिश स्कूल तळवलीचा निकाल 100 टक्के लागला. सर्वच्या सर्व 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेत 19 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रुचिता रविंद्र सुवरे (77.33 टक्के) आणि नेहा विलास लोंढे (77.33 टक्के) या दोन विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक मिळवला. रोशनी चंद्रकांत समगीस्कर (76.50 टक्के) द्वितीय तर अवंतिका अनंत कळंबाटे (74.83 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेतील 20 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सानिया यशवंत जागडे या विद्यार्थीने 66 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. किमया संतोष कांबळे (65.83 टक्के) द्वितीय तर नमिता नरेश लोंढे (65.33) ही विद्यार्थीनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. Guhagar HSC Result
आबलोली हायस्कुल
चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीच्या शास्त्र, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांचा निकाल 100 टक्के लागला. सर्वच्या सर्व 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतील शास्त्र शाखेत 19 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्त्त्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक ज्ञानदा दिपक संज्योत रेपाळ (83.67 टक्के), द्वितीय – पायल रामु उषा अहिरे (74.67) व तृतीय क्रमांक सुकन्या रविंद्र रुतिका मोरे (60.50) या विद्यार्थ्यांनी मिळवला.
वाणिज्य शाखेत 47 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. समिक्षा अनंत अस्मिता मालप (82.33 टक्के) प्रथम, साक्षी सुरेश सारिका मांडवकर (80.33 टक्के) व तेजस्वी विलास विकित बारस्कर (79.83 टक्के) तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेतील सर्वच्या सर्व 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये तेजस्वी दिपक दिपाली झोरे या विद्यार्थीने 64.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला रियान रमेश रेश्मा घेवडे (61 टक्के) द्वितीय तर साहिल यशवंत वैजयंती वेले (60.33) हा विद्यार्थी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
आबलोली हायस्कुलच्या व्होकेशनल विभागाचा निकाल 95.83 टक्के लागला. 24 पैकी 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. Guhagar HSC Result
शृंगारी हायस्कुल
शृंगारी उर्दु हायस्कुलचा निकाल 100 टक्के लागला. या विद्यालयातील कला शाखेतील 18 व वाणिज्य शाखेतील 19 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक सामिया मुस्तफा साल्हे (88.33 टक्के), द्वितीय क्रमांक इक्रा बशीर मुल्लाजी (83 टक्के), तृतीय क्रमांक शारीन एजाज शेख (82.17) तर कला शाखेत प्रथम क्रमांक शेख अहमद झुवेर मोहम्मद तसलीम (73.17 टक्के), द्वितीय क्रमांक सिद्दीकी मनतशा तबरेज (70.33), बदनकरीजुनेदी सहिफा इमामुद्दीन (67.67 टक्के) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. Guhagar HSC Result
अंजनवेल हायस्कुल
दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील कनिष्ठ महाविद्यालय, अंजनवेलचा निकाल 100 टक्के लागला. या विद्यालयातील वाणिज्य शाखेतून 30 व कला शाखेतून 10 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक – वैष्णवी भरत भुवड (87 टक्के), द्वितीय क्रमांक – अर्पिता संतोष वाडये (82.33 टक्के) आणि तृतीय क्रमांक समिक्षा राकेश पवार (78.17 टक्के) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. कला शाखेत प्रथम क्रमांक – जयेश विष्णू पडवळ (59 टक्के), द्वितीय क्रमांक – संस्कार विजय नरवणकर व संघप्रिया रोहिदास मोरे (56.67 टक्के) आणि तृतीय क्रमांक रणल प्रकाश खडपेकर (56.50टक्के) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. आयटीआय रानवीच्या टेक्निकल विभागाचा निकाल 100 टक्के लागला. सर्वच्या सर्व 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. Guhagar HSC Result