गुहागर, ता. 24 : मुंबई विज्ञान शिक्षक मंडळ संचलित डॉक्टर होमी भाभा परीक्षा दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आर्या मंदार गोयथळे, रुद्र संतोष जोगळेकर, रेईशा वीरेंद्र चौगुले हे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High School Success in Science Competitive Examination
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सुजाता कांबळे, मधुकर गंगावणे, गायत्री कनगुटकर यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. तसेच गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, शालेय प्रशासन, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे कडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. Guhagar High School Success in Science Competitive Examination