रस्त्यांच्या आरक्षणांवर अनेकजण नाराज
गुहागर, ता. 28 : नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखडयावर 1501 जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. यापैकी सर्वाधिक हरकती या रस्त्यांच्या रुंदीकरणावर आहेत. गुहागर नागरिक मंच आणि भाजपने थेट राज्य सरकारकडे धाव घेतल्याने हा आराखडा रद्द होणार कि स्थगिती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. Guhagar Development Plan


गुहागर शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 फेब्रुवारीला राजपत्रात प्रसिध्द झाला. या आराखड्यावर हरकती घेण्यासाठी 15 फेब्रुवारी ते 16 मार्च ही मुदत होती. ही मुदत नंतर 25 मार्च पर्यंत वाढविण्यात आली. आराखडा प्रसिध्द झाल्यानंतर सुरवातीचा काही काळ हा आराखडा समजुन घेण्यात वेळ गेला. नगरसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजित कार्यकर्ते या सर्वांनी हा आराखडा खऱ्या अर्थाने शहरातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोचविला. त्यानंतर विकास आराखडा की भकास आराखडा अशी चर्चा रंगु लागली. गुहागरवासीयांच्या या विरोधाला वाचा फोडण्याचे काम भाजपा आणि गुहागर नागरिक मंचाने केले. नागरिक मंच आणि भाजप पदाधिकारी यांनी विकास आराखड्यामधील अनेक त्रुटींबाबत पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान गुहागर शहरवासीयांनी हरकती नोंदविण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती केली गेली. Guhagar Development Plan


या सर्वाचा परिणाम म्हणून गुहागर शहरातील सुमारे 3000 घरमालकांपैकी जवळपास 40 टक्के घरमालकांनी हरकती नोंदवल्या. शेवटच्या दिवशी तब्बल २०० च्या वरती हरकती नोंदविण्यात आला. यामध्ये सर्वाधिक हरकती या वेलदूर गुहागर 18 मिटरचा रस्ता, शहरांतर्गत वाडीवस्त्यांमधुन जाणारे रस्ते, वरचापाट तर्फे गुहागर शहराच्या मधुन जाणारा नाव नसलेला महामार्ग यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय निवासी क्षेत्र, हरित क्षेत्र दाखविण्यात झालेल्या चुका, चुकलेल्या हद्दी, या संदर्भातील हरकती घेण्यात आल्या आहेत. शहराच्या विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या काही जमीनींबाबत जागा मालकांनी हरकती नोंदवल्या आहेत. Guhagar Development Plan
आता जनतेचे लक्ष हा विकास आराखडा रद्द होणार की स्थगित होणार, घेतलेल्या हरकतींवर सुनावणी होणार की नाही याकडे लागून राहीलेले आहे. Guhagar Development Plan