केदार साठे, सर्वसामान्यांना भरडणारा हा सदोष आराखडा
गुहागर, ता. 08 : निवडक लोकप्रतिनिधींच्या घरावर, जागेवर आरक्षणे पडते. मात्र नगराध्यक्षांच्या जागेवर पडलेले आरक्षण रद्द होते. हे गुहागरवासीयांनी समजुन घ्यावे. या सदोष आराखड्यात बदल होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती घ्यावे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे. असे प्रतिपादन भाजप जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे यांनी गुहागरमध्ये केले. ते विकास आराखड्यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. Guhagar Development Plan
शिमग्याचे होम लागून गेल्यावर आता गुहागरमध्ये विकास आराखड्यासंदर्भात शिमगा सुरु झाला आहे. आजपर्यंत वाडीवाडीत, नाक्यावर विकास आराखड्याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र कोणत्याच राजकीय पक्षाने एक निश्चित भुमिका बजावली नव्हती. आज प्रथमच भाजपने विकास आराखड्याबाबत भुमिका मांडली. Guhagar Development Plan
गुहागर वरचापाट येथील दुर्गादेवी मंदिरासमोरील सभागृहात शहर भाजपची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे उपस्थित होते. त्यांनी विकास आराखड्याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर मार्गदर्शन करताना केदार साठे म्हणाले की, गुहागरचा विकास आराखडा सदोष आहे. गुहागरची भौगोलिक रचना, पुर्वांपार असलेली लोकवस्ती आदी अनेक बाबींचा विचार या आराखड्यात नाही. 500 हून अधिक घरे बाधित होत आहेत. वास्तविक गुहागर नगरपंचायतीची स्थापना 2012 मध्ये झाली. तर मग विकास आराखडा येण्यासाठी 2023 का उजाडले. जानेवारी महिन्यात नगरपंचायतीकडे आलेल्या आराखड्यात नगराध्यक्षांच्या जागेवरही आरक्षण होते. मात्र प्रसिध्द झालेल्या आराखड्यात हे आरक्षण उठलेले दिसते. त्याचवेळी निवडक लोकप्रतिनिधी आणि सामान्यांच्या घर, जमीनीवर आरक्षणे आहेत. याचाही विचार प्रत्येक गुहागरवासीयाने करणे आवश्यक आहे. या सदोष आराखड्यावर जास्तीत जास्त हरकती येणे आवश्यक आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या हरकती येण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना मदत करावी. Guhagar Development Plan
या आराखड्याची दखल भाजपने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालक रवींद्र चव्हाण या सर्वांना गुहागरच्या विकास आराखड्यात कोणी काय केले आहे याची इत्यंभूत माहीती आहे. भाजप या विकास आराखड्याबाबत गंभीर आहे. 14 मार्चला गुहागरच्या विकास आराखड्याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत भेट ठरलेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या घरादारावर वरवंटा फिरवणाऱ्या या आराखड्याबाबत पुर्नविचार होऊ शकतो. यावर सर्वांनी विश्र्वास ठेवावा. कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र शासनाच्या व्यवस्थेप्रमाणे हरकती घेण्यात कोणीही टाळाटाळ करु नये. असे आवाहन यावेळी केदार साठे यांनी केले. Guhagar Development Plan
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, शहराध्यक्ष संगम मोरे, सामाजिक माध्यमांचे जिल्हा समन्वयक शार्दुल भावे, गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक गजानन वेल्हाळ, अरुण रहाटे, समीर घाणेकर, सौ. मृणाल गोयथळे, सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, दुर्गादेवी देवस्थानचे विश्र्वस्त संतोष मावळंकर, अतुल फडके आदी उपस्थित होते. Guhagar Development Plan