आ. जाधव यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांची मंजूरी
गुहागर, ता. 11 : गुहागर आगाराला पंधरा नव्या बसेस मिळणार असून याबाबतची मंजुरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी यासाठी प्रयत्न केले होते. Guhagar depot will get 15th bus
गुहागर आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या असून गेली १०-१२ वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत. आता आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या झाल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते. हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यासंबंधीचे पत्र आमदार श्री. जाधव यांनी देताच मंत्री सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले. Guhagar depot will get 15th bus


मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आज आमदार जाधव यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई, शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या द्याव्यात, अशीही मागणी केली आहे. ही मागणीदेखील ना. सरनाईक यांनी मान्य केली आहे. Guhagar depot will get 15th bus