• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर बसस्थानकाची तपासणी

by Manoj Bavdhankar
January 18, 2024
in Guhagar
377 4
0
Guhagar Bus Stand Inspection Mission

गुहागर आगर येथे स्वच्छता तपासणी उपस्थित वी.बी. राठोड, संजय कांबळे, गुहागर आगरातील अधिकारी व कर्मचारी

741
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आगर परीसर स्वच्छतेबाबत प्रवासी वर्गाने ही जागरूक राहणे गरजेचे आहे. – वी.बी. राठोड

गुहागर, ता. 18 : गुहागर आगारातील बस स्थानक परीसर, स्वच्छतागृह स्वच्छ आहे. परंतू   आगर परीसर स्वच्छतेबाबत प्रवासी वर्गाने ही जागरूक राहणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा ठाणे विभागाचे विभाग नियंत्रक वी.बी. राठोड यांनी व्यक्त केली. मंगळवार दिनांक 16 रोजी गुहागर आगर बसस्थानकाची तपासणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सोबत संजय कांबळे ठाणे  विभागीय भांडार अधिकारी आगार बस स्थानक स्वच्छता तपासणी अधिकारी उपस्थित होते. Guhagar Bus Stand Inspection Mission

यावेळी त्यांनी बस स्थानक परिसर, स्वच्छतागृह, रंगरंगोटी सूचना फलक, गाड्यांची स्वच्छता, गाड्यांचे वेळापत्रक फलक यांची पहाणी केली. गुहागर आगर परिसर व स्वच्छता येथील अधिकारी व कर्मवीर यांनी ठेवलेला आहे. परंतु यापुढेही नियमित असेच स्वच्छता दिसावी. तसेच स्वच्छता गृहात ऍसिड, फिनेल मारून त्याचा वास जास्ती येणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या घरात स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करतात. मात्र  काही प्रवासी स्वच्छतागृहामध्ये गुटका पाकीट, सिगारेटची थोटके तर काही ठिकाणी दारूच्या बाटल्याही टाकतात. अशा लोकांना स्थानिक ग्रामस्थांच्या  मदतीने पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशा सूचना आगर व्यवस्थापकांना दिल्या. Guhagar Bus Stand Inspection Mission

यावेळी  आगार व्यवस्थापक सौ.सोनाली  कांबळे, वाहतूक निरीक्षक स्वप्निल  शिंदे, वरिष्ठ लिपिक प्रवीण  कदम व संतोष डोके, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुनील पवार, वाहतूक नियंत्रक सुमित साळवी  व मनीष साखरकर, लिपिक मंदार कदम, रामा पुंड, राजू खंडजोडे, पत्रकार मनोज बावधनकर व  प्रवासी मित्र पराग कांबळे उपस्थित होते. Guhagar Bus Stand Inspection Mission

Tags: GuhagarGuhagar Bus Stand Inspection MissionGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share296SendTweet185
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.