खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ
गुहागर, ता. 23 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेने गुहागरच्या तरुण पिढीला सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने किनारा युवा महोत्सव सुरू केला आहे. या युवा महोत्सवाला गुहागर वासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावर्षी दि. 24 ते 26 सलग तीन दिवस चालणाऱ्या गुहागर किनारा युवा महोत्सवाचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठया दिमाखात होणार आहे. Guhagar Beach Youth Festival


लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि उत्साहामुळे हा युवा महोत्सव दरवर्षी घेतला जातो. यासाठी लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद मेहनत घेत असतात. या युवा महोत्सवात तालुक्यातील विविध महाविद्यालयातील आणि अन्य युवा वर्ग सहभागी होतो. Guhagar Beach Youth Festival
दि. 24 रोजी सायं. 5 वा. या महोत्सवाचा शुभारंभ खा. सुनील तटकरे याच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण, 6 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, होम मिनिस्टर कार्यक्रम, फनी गेम्स, लकी ड्रॉ, रात्री 8 संकासूर,
दि. 25 रोजी सायं. 6 वाजता मान्यवरांचे स्वागत, सांगित मैफिल, डान्स स्पर्धा, कॉमेडी स्किट, लकी ड्रॉ, रात्री 9 वाजता वरवेली शिंदेवाडी यांचा संकासूर कार्यक्रम सादर होणार आहे.
26 रोजी सायं. रील स्पर्धा बक्षीस वितरण, जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, लकी ड्रॉ, रात्री 10 वाजता वरवेली रांजानेवाडी यांचे संकासुर, 10.30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ तालुकावासियांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी केले आहे. Guhagar Beach Youth Festival