रामदास कदम यांचे बोलणे हे चुकीचे नाही – सचिन बाईत
गुहागर, ता. 16 : माजी तालुकाप्रमुख महेश नाटेकर म्हणाले, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे खूप बोलतात. ते भास्कर जाधव यांच्यावर टीका करतात. मात्र, त्यांनी आपली कुवत ओळखावी. त्यांच्या तवसाळ गटात एक हजार मतेदेखील त्यांना मिळत नाहीत. आम्ही ही मते प्रामाणिकपणे मिळविली आहेत. गुहागरमध्ये बेरोजगारांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्योगधंदे आणण्यासाठी जाधव यांनी काम केले आहे. मात्र, काही प्रकल्पांना येथे विरोध होत असल्याने हे सर्व मागे पडले आहे. मात्र, यापुढे आम्ही उद्योगधंदे आणण्यासाठी बांधील आहोत, असेही नाटेकर यांनी स्पष्ट केले. Guhagar assembly polls
सध्या रामदास कदम यांच्या भाजपावरील वक्तव्यांवरुन महायुतीत वाद सुरु आहेत. या वादामध्ये गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे हे भास्कर जाधव यांना विनाकारण ओढत असून त्यांच्यावर टीका करत आहेत. आपली पात्रता ओळखून बोलावे. तसेच रामदास कदम यांचे बोलणे हे चुकीचे नसल्याचे मत उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. Guhagar assembly polls
महायुतीच्या या वादात भास्कर जाधव यांचाच फायदा होणार आहे. गुहागर मतदारसंघातील प्रत्येक गावात आमचा शाखाप्रमुख, बूथप्रमुख कार्यरत आहे. आमची तयारी अगोदरपासूनच झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे. प्रत्येक गटातून आम्ही प्लसमध्ये आहोत. सर्वाधिक मताधिक्य जाधव यांना यावेळी मिळणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही मतदारांसमोर सामोरे जाताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्तेही आमच्या सोबत आहेत. ओबीसी फँक्टरचा येथे काहीही परिणाम होणार नाही. आम्ही सर्वच ओबीसी आहोत. यावेळी केवळ समाजावर निवडणूक बेंडल यांच्यारुपाने होत आहे. मात्र, याचा काहीही फरक पडणार नाही. आमच्याबरोबर सुरुवातीपासूनच सर्व समाज आहे. गुहागर तालुक्यातून भास्कर जाधव यांना पन्नास हजाराचे मताधिक्य देऊ असेही बाईत यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. Guhagar assembly polls