• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवसेनेकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

by Ganesh Dhanawade
October 22, 2024
in Politics
403 4
0
Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

राजेश बेंडल

791
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर मतदार संघात शिवसेना कि भाजप हा सस्पेन्स कायम

गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या प्रस्थापित राजकिय पक्षांनी राजेश बेंडल यांना निवडणूक रिंगणात उतरवावे, असे कुणबी समाजातील नेत्यांकडून बोलले जात होते. तसेच श्री. बेंडल सुद्धा संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत आहेत. परंतु, गुहागर मतदार संघावार भाजप आणि शिवसेनेचा दावा असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला याठिकाणी उमेदवारी मिळणे कठीण झाले आहे. बहुसंख्य कुणबी आणि ओबीसी समाज असलेल्या गुहागर मतदार संघात राजेश बेंडल यांच्यासारखा ओबीसी चेहरा दिल्यास परिवर्तन होऊ शकतो, हा विचार करून माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे गुहागर मतदार संघात शिवसेना कि भाजप हा सस्पेन्स कायम राहिला आहे. Guhagar assembly polls

गुहागरचे माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्यानंतर गुहागर तालुक्यातील कोणत्याच प्रस्थापित राजकिय पक्षाने गुहागर विधानसभेकरिता बहुजन व बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला उमेदवारी दिली नाही. राजकीय पक्षांनी कुणबी समाजाला पंचायत समिती सदस्य, सभापती – उपसभापती आणि एखादवेळी जिल्हा परिषद सदस्य एवढ्यावरच बोळवण केली गेली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी कुणबी समाजातील सहदेव बेटकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा गुहागरमध्ये संपर्क न राहिल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र राजेश बेंडल यांना उमेदवारी द्यावी. अशी आग्रही मागणी कुणबी समाजातून करण्यात येऊ लागली. Guhagar assembly polls

दरम्यान, राजेश बेंडल यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठाकडे मागणी केली होती. त्याचबरोबर त्यांनी मतदार संघात आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गाठीभेटी सुरु केल्या होत्या. राजेश बेंडल यांचा राजकीय प्रवास पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती असा झाला. या काळात त्यांनी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरी क्षेत्रात काम करताना गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागात विकास कामे केली. अनुभवाच्या बळावर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधुन निधी आणला. परंतु, या मतदार संघावार भाजप आणि शिवसेनेने दावा केल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारीचा विषय मागे पडला. Guhagar assembly polls

लोकसभा निवडणुकी दरम्यान, शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी गुहागर विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजाचा उमेदवार असेल असे जाहीर केले होते. कुणबी समाजाचा उमेदवार असेल तरच परिवर्तन होऊ शकेल, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. यासाठी राजेश बेंडल यांना शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. Guhagar assembly polls

Tags: BJPGuhagarGuhagar assembly pollsGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNCPNews in GuhagarShiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमराठी बातम्याराष्ट्रवादीलोकल न्युजशिवसेना
Share316SendTweet198
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.