सर्वाधिक महिला मतदारांची संख्या
गुहागर, ता. 18 : गुहागर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी गुहागर तहसील कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. या पत्रकार परिषदेला गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटिल, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत उपस्थित होते. Guhagar Assembly Constituency
गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान केंद्र 322, नागरिक केंद्र 6, ग्रामीण केंद्र 316, एकूण मतदान केंद्र स्थळ 3001 नागरिक केंद्र 5, ग्रामीण केंद्र 296 आहेत. एकूण मतदार दिनांक 16 /10 /2024 पर्यंतचे 2 लाख 41 हजार 975 पैकी एकूण पुरुष मतदार 1 लाख 15 हजार 208 तर स्त्री मतदार 1 लाख 26 हजार 767 आहेत. सर्वात जास्त मतदान असलेले मतदान केंद्र 92 शृंगारतळी १३८२ व सर्वात कमी मतदार असलेले मतदान केंद्र 245 लिंगाडीवाडी गुडे 192, ज्येष्ठ नागरिक 1.36% एकुण 3294, पुरुष मतदार 177, स्त्री मतदार 227, दिव्यांग मतदार 0.75% एकुण 127, पुरुष मतदार 845, स्त्री मतदार 427 युवा मतदार 1.59% एकूण 3841 पुरुष मतदार 2042 स्त्री मतदार 1799 आहेत. Guhagar Assembly Constituency
नियुक्त झोनल अधिकारी संख्या 53, खेड 22, चिपळूण, 15 गुहागर 16 नेमलेली एकूण भरारी पथके एफ एस 12 खेड 1, चिपळूण 1, गुहागर 2, नेमलेली एकूण व्हिडिओ सर्वेक्षण पथके 6 खेड 1, चिपळूण 1, गुहागर 1, नेमलेली एकूण स्थिर सर्वेक्षण पथके 5, खेड 1, चिपळूण1, गुहागर 3, निवडणुकीच्या विविध कामासाठी तयार केलेली पथके 21 प्रत्यक्ष मतदान घेणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांची संख्या 1450 मतदानापूर्वी Evm ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले ठिकाण घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लव्हेल मुलांचे वस्तीगृह तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी हे आहे. Guhagar Assembly Constituency