गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे जि.प. केंद्र मराठी शाळा नं.१ ला गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दीपक जावरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच पाटपन्हाळे शाळेचे शिक्षक गोपाळ राठोड यांना पदोन्नती मिळाली याबद्दल त्यांचा गटशिक्षणाधिकाऱ्यांहस्ते सत्कार करण्यात आला. Group Education Officers visit Patpanhale School


यावेळी जिल्हा नियोजनमधून शाळा दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये मंजूर झाल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. शाळेची पटसंख्या राखण्यात येथील शिक्षक व ग्रामस्थांचे चांगले योगदान असल्याचे गळवे यांनी सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला पाटपन्हाळे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सुधाकर चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद चव्हाण, शृंगारी उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक हवा, शिक्षिका मंगल अनगुडे, पल्लवी घुले, शिक्षक सुरेश आंबेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. Group Education Officers visit Patpanhale School