रत्नागिरी, ता. 29 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातील सावरकर स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. Greetings on Veer Savarkar Jayanti
रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे, अमित विलणकर, परशुराम तथा दादा ढेकणे, मंदार खंडकर आदींसह भाजप कार्यकर्त्यांनी कारागृहातील वीर सावरकर स्मारकाला भेट दिली. तसेच लक्ष्मी चौक येथे पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करत भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. Greetings on Veer Savarkar Jayanti
या वेळी बाळासाहेब माने यांनी सांगितले की, रत्नागिरीमध्ये स्वा. सावरकरांना ब्रिटीशांना स्थानबद्ध केले, या गोष्टीला शंभर वर्षे झाली आहेत. त्या काळी जिल्हा सोडायचा नाही व राजकारणात भाग घ्यायला सावरकरांना बंदी केली होती. परंतु सावरकरांनी समाजकारण करत हिंदु धर्मासाठी अनेक गोष्टी केल्या. समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले. उपेक्षितांसाठी विठ्ठल मंदिर खुले केले, सावरकरांच्या विनंतीवरून रत्नागिरीचे दानशूर, भंडारीभूषण भागोजीशेठ कीर या महान व्यक्तीमत्वाने पतितपावन मंदिर जागा घेऊन, स्वखर्चाने उभे केले. वीर सावरकरांचे कार्य रत्नागिरीकर विसरू शकत नाही. Greetings on Veer Savarkar Jayanti