• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोपाळगड संवर्धनासाठी दिपक वैद्यांची साद

by Mayuresh Patnakar
July 30, 2026
in Guhagar
16 0
0
Gopalgad fort
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुरातत्त्व विभागाला १३ मागण्यांचे पत्र

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल मधील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला खाजगी अतिक्रमणातून मुक्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. याचवेळी हा विषय प्रथम लोकांसमोर आणणारे स्थानिक दुर्गप्रेमी दिपक वैद्य यांनी पुरातत्व विभागाकडे गोपाळगड संवर्धनाला दिशा देणारे काही मुद्दे मांडले आहेत. त्यामध्ये गडाच्या मालकीची संपूर्ण जागा ताब्यात घेणे, तटबंदीच्या आतील जुन्या विहीरी पुरूज्जीवीत करणे, गोपाळगडाचा इतिहास सांगणारे संग्रहालय तयार करणे, गडावरील हलविलेल्या तोफा शोधून त्या गडावर स्थापित करणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. Gopalgad fort

दिपक वैद्य यांनी सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाला पाठवलेल्या पत्रात खालील मागण्या केल्या आहेत.

गोपाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी स्थानिक संस्था, पत्रकार यांच्या सोबतीने  पुरातत्व विभागाने न्यायालयापर्यंतच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे, यापुढे  गोपाळगड किल्याला गत वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर अनेक दुर्गप्रेमीं सोबतच सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका ‘पुरातत्व विभागाची’ राहणार आहे. यासाठी आपल्या समोर फार महत्वाचे मुद्दे मी या पत्राद्वारे मांडत आहे. Gopalgad fort

१) गोपाळगड किल्ला एकूण सात ते आठ एकर परिसरात विस्तारलेला असून सध्या दिसत असलेल्या तटबंदीच्या बाहेर समुद्रालगत पूर्व ते ईशान्य खालच्या भागात देखील किल्याचे क्षेत्र पसरले आहे.त्यातील अजूनही खाजगी मालकीत असलेल्या जागेची कागदोपत्री पडताळणी करावी आणि  संपूर्ण गोपाळगड किल्याची शासकीय मोजणी करून घ्यावी नंतर भू संपादन करून ते क्षेत्र ताब्यात घ्यावे आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे. Gopalgad fort

२) गोपाळगड किल्याच्या तटबंदीच्या आतील आणि बाहेरील जागेत जुन्या वाड्यांची जोती, जुन्या विहिरी असे ऐतिहासिक अवशेष होते अजूनही आहेत. या जागेवर  ताबा असलेल्या व्यक्तीने तटबंदीच्या आतील गोड्या पाण्याच्या विहीरी (बारव) दगड माती घालून बुजवल्या आहेत.त्या  पुनःरुजीवित कराव्यात.त्यामुळे अंजनवेल गावासाठी पाण्याचे स्तोत निर्माण होऊ शकतात. Gopalgad fort

३) किल्याच्या तटबंदीच्या आतील असलेली आंबा कलमे  तसेच अन्य वृक्ष  गड संवर्धनाच्या दृष्टीने अडचणीची, धोकादायक ठरत असतील ती पूर्णपणे काढून टाकवित. Gopalgad fort

४) राज्य संरक्षित स्मारक गोपाळगड किल्यामध्ये पुरातन ऐतिहासिक शस्त्र, आणि पुराण वस्तू संग्रहालय, वाचनालय, इतिहास अभ्यासिका यांची निर्मिती करावी. Gopalgad fort

५) गोपाळगड किल्यात कायम स्वरूपी वीज व्यवस्था करून घ्यावी.स्वच्छता गृह,उपहार गृह, कचऱ्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे तसेच किल्यात महत्वाच्या भागात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसवावी.आणि सौर ऊर्जेवरती चालणारे मोठे पथदीप लावण्यात यावे. Gopalgad fort

६) गोपाळगड किल्यात कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक, टुरिस्ट गाईड, सफाई कर्मचारी,अन्य कुठल्याही कामासाठी माणसांची नेमणूक करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा अंजनवेल गावातील पात्र असलेल्या स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. Gopalgad fort

७) गोपाळगड किल्ला स्वराज्यात जिंकून घेणासाठी प्रयत्न करणाऱ्या इतिहासातील प्रमुख पराक्रमी सरदार, शासक यांचा लढा, पराक्रम यांची आठवण म्हणून त्यांच्या प्रतिमेसहित त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती असलेले मोठे फलक लावले जावेत. Gopalgad fort

८) गोपाळगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तसेच सरखेल तुळोजी आंग्रे यांचा पुतळा,स्मारक उभारले जावे. Gopalgad fort

९) गोपाळगड किल्या विषयीचा इ.स.१७०८ सालचा फारसी भाषेतील शिलालेख  छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालंय [ CSMVS ] मुंबई येथे ठेवण्यात आला आहे तो परत सन्मानपूर्वक किल्यावर आणून व्यवस्थित संरक्षित करून मराठी अनुवादासह सामांन्य नागरिक,पर्यटक, दुर्गप्रेमी यांना पाहण्यासाठी खुला करण्यात यावा. Gopalgad fort

१०) गोपाळगड किल्यावर पूर्वी अनेक ऐतिहासिक तोफा होत्या त्यातील आत्ता फक्त चार तोफा शिल्लक राहिल्या आहेत आणि त्या अंजनवेल गावातच इतरत्र ठेवण्यात आल्या आहेत.त्या पुन्हा किल्यावर नेऊन उत्तरेच्या समुद्राकडील वेगवेगळ्या चार मुख्य बुरुजांवर कायम स्वरूपी बसवण्याची योग्य व्यवस्था करावी. Gopalgad fort

११) शिवजयंती उत्सव, तुळोजी आंग्रे यांचा पराक्रम दिन ( दि. २३ जानेवारी १७४५ रोजी तुळोजींनी गोपाळगड जिंकला तो दिवस ) गोपाळगड किल्यावर पुरातत्व विभाग, शासन, दुर्गप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मार्फत शासकीय कार्यक्रम म्हणून एकत्रितरित्या दरवर्षी साजरा करण्यात यावा. Gopalgad fort

१२) गोपाळगड किल्ला यापुढील काळात कायम स्वरूपी शासनाच्या पुरातत्व विभागाच्या कागदोपत्री आणि प्रत्यक्षातही अखत्यारीत राहील याची मुख्यत्वे काळजी घ्यावी. Gopalgad fort

‘गोपाळगड किल्लाचे संवर्धन’ विषयक कोणत्याही कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी दुर्गप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ यांची मते जाणून घेणे आणि अशा अनेक विषयांवर प्रत्यक्ष चर्चा करणे खूप महत्वाचे आहे. याविषयी आपण आपले विभागीय पुरातत्व कार्यालय रत्नागिरी किंवा मा.तहसीलदार कार्यालय गुहागर याठिकाणी अथवा गोपाळगड किल्ला अंजनवेल इथे एक बैठक आयोजित करावी.यामध्ये सर्व दुर्गप्रेमी, संस्था यांना निमंत्रित करावे. हे सगळे विषय चर्चेला यावेत समजून घ्यावेत अशी विनंती दिपक वैद्य यांनी केली आहे. Gopalgad fort

Tags: FortGopalgad fortGuhagarGuhagar NewshistoryLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarइतिहासगोपाळगडगोपाळगड किल्लाटॉप न्युजताज्या बातम्यापुरातत्त्व विभाग (यांची वेबसाईट लिंक टाकावी)मराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.