वृक्षपालक करणार संवर्धन, अनुलोमची लक्ष्यपूर्ती
गुहागर, ता. 30 : अनुलोम या सामाजिक संस्थेने जुलै महिन्यात गुहागर भागात 300 वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले होते. महिनाभरात विविध संस्था आणि व्यक्तीच्या मदतीने 403 वृक्षांची प्रत्यक्ष लागवड केली. त्याचप्रमाणे या वृक्षांचे पुढील तीन वर्ष संगोपन करण्यासाठी वृक्षपालकांचीही नियुक्ती करण्यात आली. Planting of 287 trees in Guhagar

अनुगामी लोकराज्य महाभियान या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात देववृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानाचा संकल्प केला होता. याच अभियानांतर्गत गुहागर भागात 300 वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. गुहागर भाग जनसेवक ज्ञानेश्र्वर शिंदे, भाग संवादिनी सौ. स्मिता पाडावे आणि सौ. श्रेया विरकर यांनी या अभियानाचे नियोजन केले. गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील सामाजिक वनिकरणच्या रोपवाटिकेमधुन रोपे घेण्यात आली. यामध्ये आवळा, साग, चिंच, काजू, पेरु, आंबा, खैर, बेल, सोनचाफा, वड, पिंपळ, जांभुळ, आदी झाडांचा समावेश होता. रोपे उपलब्ध झाल्यावर गुहागर भागातील अनुलोम मित्रांच्या मदतीने या रोपांचे वितरण करण्यात आले. Planting of 287 trees in Guhagar

गुहागरमध्ये लायन्स क्लब ऑफ गुहागर सीटी आणि अनुलोमच्या माध्यमातून पुशवैद्यकीय दवाखान्यात वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात देव वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानांतर्गत तीन नारळ एक जांभूळ आणि एक बहावा अशा पाच वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला गुहागर नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, नगरसेविका सौ वैशाली मावळणकर, सौ विशाखा गुरव, नगरसेवक संतोष सांगळे, गुहागर शहर भाजपा अध्यक्ष नरेश पवार, गुहागर शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ प्रांजली कचरेकर, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी चे अध्यक्ष मनीष खरे, सेक्रेटरी सुधाकर कांबळे, संचालक डॉक्टर अनिकेत गोळे, नितीन बेंडल, हॉटेल व्यवसायिक व पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत खातू, आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त मिलिंद गाडगीळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चोकोते, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक शैलेश मिसाळ, हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन अनुलोम मित्र सौ अमृता जोशी, सौ मधुरा मोरे, श्री संतोष घुमे, श्री विकास मालप व रायगड उपविभाग जनसेवक मयुरेश पाटणकर यांनी केले होते. Planting of 287 trees in Guhagar

ग्रामपंचायत काताळेच्यावतीने तवसाळ रस्त्यावर आणि ग्रामपंचातय परिसरात २० झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, काताळे सरपंच सौ. प्रियांका सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे, यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी अमोल सुर्वे, दिपक बारस्कर, सोनाली पंडित, तसेच ग्रामस्थ सुधाकर बारस्कर, विनायक सुर्वे, भिकु बारस्कर, दिलीप गुरूसुळे सर आदी उपस्थित होते. वृक्ष लागवड २० या उपक्रमाला अशोका इन्फ्रा कंपनीच्या अभिषेक कुमार, अभिनंदन कुमार, अमित सींग, नीरज पांडे यांनी मदत केली. Planting of 287 trees in Guhagar

गुहागर तालुक्यातील पिंपरचे अनुलोम मित्र प्रकाश मोरे यांनी ८ रोपे लावण्याचा कार्यक्रम केला. यावेळी येथे अनुलोम च्या माध्यमातुन झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक श्री. अनिल मोरे, जेष्ठ ग्रामस्थ श्री. सुरेश मोरे, श्री. विनोद मोरे श्री. प्रमोद मोरे, श्री. प्रकाश सदाशिव मोरे, श्री. अशोक घाग, श्री. राम मोरे श्री. जयेश पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. शमीका घाग, पोलीस पाटील श्री. संजय घर्वे आणि ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर सौ. सायली मोरे उपस्थित होते. Planting of 287 trees in Guhagar

हेदवी ग्राम संस्थेच्या जागेत मातोश्री लक्ष्मी बाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन हेदवी यांच्या मदतीने देशी झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी दक्षता समितीचे अध्यक्ष अभय भाटकर, संदीप हळदणकर, मुख्याध्यापक श्रीकांत जोगळेकर, इको क्लब चे प्रमुख विलास साटले, ज्येष्ठ शिक्षक बापु बांगर, कला शिक्षक मोहन बुरटे, गायकवाड सर, योगेश चव्हाण सर, सौ. सोनाली वसावे, सौ. प्रज्ञा रेडिज, कु. तेजस्वी पाटील, अरुण मोहिते, लाडक्या पराड, शिपाई प्रफुल्ल संसारे आणि विद्यार्थी उपस्थित होते. Planting of 287 trees in Guhagar

देवघर चव्हाणवाडी या ठिकाणी अनुलोम मित्र व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये 16 देशी वृक्षांचे लागवड करण्यात आले. यावेळी अनुलोम मित्र श्री मंदार कदम, ग्रामस्थ श्री संतोष रामचंद्र चव्हाण, श्री शंकर अर्जुन चव्हाण, श्री बळीराम महादेव चव्हाण, श्री सुशील सदानंद चव्हाण, सौ.शुभांगी सचिन चव्हाण, शर्मिला सुरेश शेलार, सौ.उज्वला श्रीधर कदम, सौ.मयुरी मंदार कदम, सौ.सुलभा बळीराम चव्हाण, वरद मंदार कदम तसेच अनुलोमच्या वतीने सौ स्मिता पाडावे (भाग संवादिनी ) व श्री ज्ञानेश्वर शिंदे (भाग जनसेवक) उपस्थित होते.
अशा पध्दतीने गुहागर भागातील 89 ग्रामस्थांच्या मदतीने 403 वृक्षांची लागवड करण्यात आली असून प्रत्येक रोपाला वृक्षपालक निश्चित करण्यात आला आहे. लागवड झालेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड करताना प्रत्येक झाडाचा जीओ टॅग फोटो घेण्यात आला आहे. दर तीन ते चार महिन्यांनी पुन्हा त्याच झाडांचे जीओ टॅग फोटो घेऊन ऑडीट करण्यात येणार आहे. अशी माहिती अनुलोमचे भाग जनसेवक ज्ञानेश्र्वर शिंदे यांनी दिली आहे. Planting of 287 trees in Guhagar
