संवेदनशील मनाचे कोरके सर यांचा वैचारिक वारसा जपणे ही काळाची गरज; डॉ मनोज पाटील
गुहागर, ता. 13 : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोरके सर हे सेवाभावी वृत्तीने काम करणारे, शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये तळमळीने काम करणारे, गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीसाठी झटणारे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. संविधान दिन रॅली, वृक्षारोपण यासह अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या कै विलास कोरके सर यांचा वैचारिक वारसा जपणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक डॉ मनोज पाटील केले ते गुहागर कनिष्ठ महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता प्रतिष्ठान आयोजित सुशासन दिन कार्यक्रम बोलत होते. Good Governance Day at Guhagar College


कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरके सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षक श्री मधुकर गंगावणे हे होते. सदर कार्यक्रमाला प्राध्यापिका मनाली बावधनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, युवा नेते नितीनजी घरत, मेटकरी सर, माळी मॅडम, पालशेतकर मॅडम, गुरव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. मधुकर गंगावणे यांनी त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यालयातील कोरके सरांचे योगदान खूप महत्त्वाचे होते. सर्वांशी ते मिळून मिसळून वागत होते सौ मनाली बावधनकर व सौ पालशेतकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन सौ माळी मॅडम यांनी केले. Good Governance Day at Guhagar College

