• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निसर्गाला आरक्षण द्या…

by Guhagar News
March 7, 2024
in Guhagar
70 0
0
Give reservation to nature
137
SHARES
391
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पर्यावरण स्नेहींनी दापोलीतील सहविचार सभेत केली शासनाकडे मागणी

गुहागर, ता. 07 : निवेदिता प्रतिष्ठान दापोली, टेलस आॅर्गनायझेशन पुणे, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे आणि महाएनजीओ पुणे यांच्या संयुक्त पुढाकाराने दिनांक २ आणि ३ मार्च २०२४ रोजी दापोली तालुक्यातील जालगाव येथील आम्रपाली होम स्टे येथे पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. Give reservation to nature

Give reservation to nature

या सहविचार सभेमध्ये पहिल्या दोन सत्रात प्लास्टिक कचरा मुक्त शाळा विषयी प्रस्ताव मांडणी, पाणी नियोजन सांघिक लढा, मानसिक बद्दल घडवून आणण्यासाठी संघटित कृती आराखडा, वणवा मुक्त गाव संकल्पना, कचरामुक्त पर्यटन संकुल संकल्पना आणि कचरा मुक्त मी संकल्पना इत्यादी निसर्ग संवर्धन संदर्भात निर्णायक खुली चर्चा करण्यात आली. तर तिसऱ्या सत्रात पहिल्या दोन्ही सत्रातील विषयांवरील अहवाल तयार करण्यात आला व शासनाकडे “निसर्गाला आरक्षण द्या” अशी मागणी करण्याचा सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला असून त्या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना/शासनाला सादर करणार असल्याची माहिती प्रशांत परांजपे यांनी दिली आहे. Give reservation to nature

सदर पर्यावरण स्नेहींच्या सरविचार सभेचे उद्घाटन शनिवारी दुपारी ३ वाजता झाले. यावेळी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, टेलस संस्थेचे अध्यक्ष लोकेश बापट, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीच्या अध्यक्षा प्रिया भिडे आणि महाएनजीओचे अध्यक्ष शिंदे साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला सदर  सभेचे प्रास्ताविक व उद्देश लोकेश बापट व प्रशांत परांजपे यांनी उपस्थित पर्यावरण स्नेहींना समजावून सांगितले. या पर्यावरण सहविचार सभे करिता मुंबई, पुणे, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड इत्यादी ठिकाणाहून सुमारे ५०/६० पर्यावरण स्नेही कार्यकर्ते उपस्थित होते.  त्यावेळी सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. Give reservation to nature

Give reservation to nature

यावेळी पर्यावरणासाठी चांगले उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा /संस्थांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, एस.टी. अधिकारी रेश्मा मधाळे, बांधकाम व्यावसायिक मयुरेश शेठ, शेंर्दिय शेती करणारे विनायक महाजन आणि नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमात अग्रेसर असणारी उमराठ ग्रामपंचायत यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत उमराठच्यावतीने सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सन्मान स्विकारला. Give reservation to nature

यावेळी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उमराठच्या. दि. २५.१.२०२४ च्या ग्रामसभेत प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्टील बाटली नेहमी वापरण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याचे पाळण सुद्धा ग्रामस्थांनी सुरू केले आहे. अर्थातच यासाठी सर्व ग्रामस्थांचे आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे, शिक्षकवर्गाचे,  ग्रामपंचायत उमराठचे सर्व सदस्य, ग्रामसेवक आणि सर्व कर्मचारी, आशा सेविका, मदतनीस, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य संवर्धिनी केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे, असेही सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी पर्यावरण स्नेही सहविचार सभेच्या आयोजकांना पर्यावरण संवर्धनाबाबत चांगले काम करत असल्या बद्दल शुभेच्छा देऊन आभारही मानले आहेत. Give reservation to nature

Tags: Give reservation to natureGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.