संगमेश्वर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; अटक केलेल्या आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत
गुहागर, ता. 29 : प्रेयसीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत तिला भातगाव पुलावरून ढकलून तिची अँक्टीव्हा गाडी घेवून पोबारा करणाऱ्या प्रियकराला संगमेश्वर पोलीसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून ४ लाख ५६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलीसांकडून हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, संगमेश्वर पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भातगाव पुलावर काम करणार्या कामगारांनी तिला वाचवले. Girlfriend pushed from Bhatgav bridge
सपना संदीप डिंगणकर हिला नितीन गणपत जोशी, वय २७ वर्षे, मुळ रा. मधलीवाडी, पाचेरीसडा, ता. गुहागर, जि. रत्नागिरी सद्या रा. रुम नं. २०३, सिध्दीविनायक बिल्डींग, चंदननाका, प्रगतीनगर, नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. दिनांक २१/१०/२०२४ रोजी यातील फिर्यादी हिस नितीन याने मुळ गावी काम असल्याचे तेथे जायचे आहे असे सांगितल्याने सपना यांनी आपलेकडील सोन्या चांदीचे दागिने, वापरते दोन मोबाईल व तिच्या भावाने तिच्याकडे ठेवलेली अँक्टीवा गाडी असे सोबत घेवून आरोपीसह नालासोपारा येथुन दिनांक २१/१०/२०२४ रोजी २०.०० वा.चे सुमारास ट्रॅव्हल्सने निघाले ते दि. २२/१०/२०२४ रोजी ०६.०० वा. चे सुमारास गुहागर परिसरात आले. तेथे नितीन याने सपना यांची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तो त्याचे घरी निघुन गेला. त्यानंतर दि. २२/१०/२०२४ रोजी १७.०० वा. चे सुमारास आरोपी याने त्या हॉटेलवर जावून फिर्यादी यांना आरोपी याचा मित्र भातगाव ब्रीज येथे भेटायला येणार आहे असे सांगून आपण त्याला भेटुन नालासोपारा येथे परत जाऊ असे सांगितले. त्यानंतर आरोपी हा फिर्यादी यांना अॅक्टीव्हा गाडीने भातगाव ब्रीज येथे घेवुन गेला. तेथे २०.०० वा. चे सुमारास आरोपी याने फिर्यादी या बेसावध असताना त्यांना दोन्ही हाताने उचलुन ठार मारण्याच्या उद्देशाने भातगाव पुलाच्या कठड्यावरुन खाली पाण्यामध्ये टाकले व फिर्यादी यांचे सोने, चांदीचे दागिने असलेली पर्स, मोबाईल व अँक्टीवा मोटारसायकलसह चोरुन घेवुन निघून गेला. म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाणे गु.रजि.नं. ८५/२०२४, भा.न्या.सं.२०२३ कलम १०९ (१). ३०९ (६) प्रमाणे दिनांक २३/१०/२०२४ रोजी दाखल करणेत आलेला आहे. Girlfriend pushed from Bhatgav bridge
सदरचा गुन्हा हा महिलाविषयक गंभीर असल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/श्री. यादव यांनी पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१२७३ मनवल, पोकॉ/१३५६ मस्कर यांचे तपास पथक आरोपीचे शोधास रवाना केले. आरोपी नितीन गणपत जोशी, वय २७ वर्षे, याचा शोध घेत असताना तुळीज पोलीस ठाणे, नालासोपारा येथे सापळा रचून आरोपी यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने फिर्यादी यांचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल व अॅक्टीवा गाडी चोरल्याचे कबुली दिली. म्हणून त्यास गुन्हयाचेकामी दिनांक २६/१०/२०२४ रोजी तपासिक पोउनि/नागरगोजे यांनी अटक करून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी याचे ताब्यातून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने, वापरते दोन मोबाईल व अॅक्टीवा गाडी असा एकूण ४,५६,०००/- रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. Girlfriend pushed from Bhatgav bridge
सदरची कामगिरी मा. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, मा. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी यांचे आदेशाने अमित यादव, पोलीस निरीक्षक, संगमेश्वर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/शंकर नागरगोजे, पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१२७३ मनवल, पोकॉ/१३५६ मस्कर, पोकॉ/२७ खोंदल, तांत्रिक विश्लेषण कक्ष यांचेकडील अमंलदार पोहेकॉ/रनिज शेख, पोकों/निलेश शेलार यांनी केली आहे. Girlfriend pushed from Bhatgav bridge