रत्नागिरी, ता. २६ : कोकणचे अभ्यासक, लेखक ॲड. विलास पाटणे लिखित प्रतिमा आणि प्रतिभा हे पुस्तक खेडच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. उद्या (ता. २७) सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम होणार असून यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलावडे उपस्थित राहणार आहेत. Gift of books to Siddhayoga Law College
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते रत्नागिरीमध्ये प्रतिमा आणि प्रतिभा हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. अॅड. विलास पाटणे यांनी ४५ वर्षांच्या वकिलीच्या कार्यकाळात भेटलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तींवर तसेच न्यायाधीश, वकिलांवर लेख लिहिले आहेत. या पुस्तकातून नवोदित वकिलांना वकिली, न्यायपरंपरा यांचा उज्ज्वल वारसा समजणार आहे. या कार्यक्रमाला लेखक ॲड. विलास पाटणे, ॲड. संतोष कोठारी, ॲड. मिलिंद जाडकर, संस्थेच्या विश्वस्त डॉ. हेमांगी पोळ, महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲड. प्रीती बोंद्रे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या समन्वयक ॲड. हर्षदा कदम आहेत. Gift of books to Siddhayoga Law College
या पुस्तकातून नवोदित वकिलांना प्रेरणा मिळेल आणि करिअरमध्ये नवी दिशा मिळेल. शिवतेज आरोग्य संस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित केला आहे. मागील पिढीतील मान्यवरांचा वारसा पेलवित नव्या आव्हानांना सामना करण्याचे बळ त्यांना मिळेल. त्यानंतर न्यायमूर्ती नलावडे हे खेड बार असोसिएशन व ज्ञानदीप विधी महाविद्यालयाला भेट देणार आहेत. Gift of books to Siddhayoga Law College