बळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची रेल्वे प्रशासनकडे मागणी
गुहागर, ता. 26 : मुंबई येथून कोकणामध्ये येणाऱ्या मत्स्यगंधा व कोकण कन्या एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना प्रचंड प्रवाशांची गर्दी होत असून या दोन्ही गाड्यांना जनरल डबे पुढे आणि मागे वाढवावेत यामुळे आमच्या कोकणातील सर्वसामान्य प्रवाशी जनतेचे प्रवासात हाल होणार नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी आणि जनरल डबे वाढवावे अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार पराग कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. General coaches should be increased for Netravati and Matsyagandha trains.


कोकणातील जनता ही प्रामुख्याने मुंबई शहरांमध्ये नोकरी धंद्यानिमित्त आणि व्यवसाय निमित्त ये जा करीत असतात. मत्स्यगधा व नेत्रावती या गाड्यांचे जनरल डबे ते जाग्यावरच फुल होतात पुढील प्रवाशाला या डब्यामध्ये चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागते. काही प्रवासी जीवावर उदार होऊन प्रवास करतात. तरी रेल्वे प्रशासनाने या गंभीर स्थितीची दखल घेऊन जनरल डबे वाढवावेत. कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पराग कांबळे यांनी केली आहे. General coaches should be increased for Netravati and Matsyagandha trains.