आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखालील सभा गाजली
गुहागर, ता. 14 : विकासासाठी निधी उपलब्ध होतं नसल्याने आ. जाधव यांनी गुहागरच्या आमसभेत सरकारच्या एकूण धोरणावर निशाणा साधला. आदीच्या काँग्रेसच्या काळात जे घडत नव्हते ते आता घडतेय. पुर्वी काँग्रेसने जर विरोधकांना नीधी न देण्याचे धोरण केव्हाच आखले नाही. राजकीय मतभेद असतील. परंतु जी कामे सुचवीली जातात ती जनतेसाठी मग जनतेकडूनच जमा केलेला कर रूपी नीधी विकासासाठी देण्यासाठी आताच्या महायुती सरकारचे आडमुठी धोरण सुरू आहे. पंचायत समितीचे गतवर्षापेक्षा यावर्षीचे कमी बजेटचे धोरण हे तीजोरीतील खडखडाट भरून काढून लाडकी बहीण योजनेला पैशाची तरतुद करण्यासाठीच. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांसाठी गुहागरसाठी एकही रूपया दिला गेला नाही. जलजीवन मिशनचा पूर्णपणे बटयाबोळ होणार हे मी सुरूवातीपासूनच सांगत होता. आता लोकसभा निवडणूक होऊन गेल्या. यामुळे पुर्नरप्रस्तावीत मंजूरीसाठी दाखल झालेले प्रस्ताव तसेच राहणार अशी भीतीही यावेळी आ. जाधव यांनी व्यक्त केली. General Assembly at Guhagar
गुहागरची आमसभा आ. भास्करराव जाधव याच्या अध्यक्षतेखाली कीर्तनवाडी येथील भंडारी भवन मध्ये पार पडली. या आमसभेत आ. जाधव यांनी अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढले. यावेळी वर्षभरातील अन्नसुरक्षा मंजूर व प्रस्तावीत लाभार्थ्यांची चौकशीचा ठराव आमसभेतून अन्नसुरक्षा योजना चांगलीच गाजली. तुम्ही आमच्या पक्षात या तुम्हाला रेशनदुकान मंजूर करून देतो. असे तळवलीतील रेशनदुकानदार करत असून हे उद्योग थांबवा, अन्यथा महागात पडेल. अशा सज्जड दमही आ. जाधव यांनी आमसभेतून भरत ज्याला गरज आहे त्याला रेशनदुकान दया. अन्नसुरक्षा योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या १०९० प्रस्ताव व सध्या नव्याने ३४ गावातील दाखल झालेले १०३४ प्रस्तावातील लाभार्थ्यांची चौकशी करण्यात यावी. यामध्ये दोषी आढणाऱ्यांवर कारवाई करावी. असा ठराव घेत, खरोखरच ज्याला गरज आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सुचना केल्या. शेवटी सरकाने कितीही आडमुठी धोरण घेतले तरी नीधीची कमी पडू देणार नाही. ही शेवटची आमसभा असली तरी पुढील आमसभेला आपणच येणार असल्याचा विश्वास आ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. General Assembly at Guhagar
गुहागरच्या आमसभेतून महायुतील सरकारविरोधी निषेधाचा ठराव घेण्यात आला. यामध्ये तालुक्यातील विकास कामांसाठी नीधी ने देण्याचे सरकारचे धोरण असून या आमसभेतून सरकारचा निषेध ठराव माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर यांनी मांडला. मुंबई गोवा महामार्गावर गुहागर तालुक्यातील हेदवी येथील एकाच कुटुंबातील आठजण मृत्युमुखी पडले. त्या कुटुंबाला सरकाने एकही रूपयाची मदत दिली नाही. अशा सरकाचा निषेधाचा ठराव. माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर यांनी मांडला. तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरीता गुहागरसाठी एकही रूपयाचा निधी न देणाऱ्या सरकारचा निषेधाचा ठराव माजी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी मांडला. General Assembly at Guhagar
या आमसभेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, तहसिलदार परिक्षित पाटील, पोलिस निरिक्षक सचिन सावंत, सामाजिक वनीकरणाच्या श्रीमती देसाई, महावितरणचे श्री. गेडाम, शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन बाईत, नेत्रा ठाकूर, विलास वाघे, महेश नाटेकर, प्रवीण ओक, जयदेव मोरे, पांडुरंग कापले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर आदी उपस्थित होते. General Assembly at Guhagar