आंबा, काजू, सागाची झाडे होरपळली, बागायतदाराचे 3 लाखाचे नुकसान
रत्नागिरी, ता. 09 : चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हानेच्या सीमेवर पाँवरहाऊस परिसरात रस्त्याच्या बाजूला 33 के.व्ही. वीजवाहिनीच्या ठिणग्या पडून लागलेल्या आगीत देवघर येथील बागायत जळून खाक झाली. यामध्ये बागायतदाराचे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले असून वीज वितरण कंपनीने ठिणगी पडूनच ही आग लागल्याचे कबूल केल्याची माहिती त्यांनी दिली. आगीची घटना 7 मार्च रोजी दुपारी घडली. Garden was burnt in the fire

मार्गताम्हाने येथील शेतकरी बागायदार संदीप कृष्णा चव्हाण यांचे मार्गताम्हाने पाँवरहाऊसजवळ देवघर गावच्या हद्दीत मार्गताम्हाने गोपाळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला साडेआठ एकर क्षेत्रात फार्महाऊस आहे. या क्षेत्रात आंबा, काजू, साग, खैर यांची लागवड केलेली आहे. ऐन हंगामात येथील आंबा, काजू चांगलीच फळधारणाही झाली होती. येथूनच चिपळूणवरुन गुहागरकडे 33 के.व्ही.ची वीजवाहिनी गेली आहे. उच्च दाबाच्या असणाऱ्या या वीजवाहिनीच्या अचानक ठिणग्या पडल्या. यामुळे परिसरात मोठी आग लागली. ही आग पसरुन संदीप चव्हाण यांच्या फार्महाऊसमध्ये गेली. उन्हाचा भडका असल्याने ही आग फार्महाऊच्या 8 एकर क्षेत्रात पसरली आणि क्षणार्धात येथील सर्वकाही वनसंपदा खाक झाली. Garden was burnt in the fire
या आगीत 100 आंबा कलमे, 200 काजू 200, 350 सागाची झाडे जळून गेली. तसेच खैर प्रजातीच्या झाडेही होरपळली. शिवाय पाणीपुरवठ्याची वाहिनीही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले मात्र, भर दुपारच्या या आगीला आवरणे कठीण झाले. महावितरणचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन ही आग ठिणगी पडून झाल्याचे कबूल केले आहे. यामध्ये बागायतदार संदीप चव्हाण यांचे 3 लाखाचे नुकसान झाले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी वीज कंपनीकडे केली आहे. Garden was burnt in the fire
