गुहागर, ता. 22 : तालुक्यातील काताळे गावचे ग्रामस्थ, डोंबिवलीतील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Ganesh Kadam becomes BJP’s Kalyan District Secretary
प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार, कार्य तसेच संघटन तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम येणाऱ्या काळात अधिक जोमाने करू व दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असं गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Ganesh Kadam becomes BJP’s Kalyan District Secretary

कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या हस्ते पदनियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन गणेश कदम यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पदाधिकारी संदीप माळी, ज्ञानेश्वर आलम व कार्यकर्ते उपस्थित होते. आपण भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय इतिहास घडविणाऱ्या सशक्त कार्यकर्ता मधील एक घटक आहात, आपल्याला पक्षाने दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने आणि संपूर्ण ताकदीने पार पाडाल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांनी म्हटलं. Ganesh Kadam becomes BJP’s Kalyan District Secretary
