स्वयंभु गजानन,अंजनवेल विजेता तर उपविजेता महापुरुष गुहागर
गुहागर, ता. 02 : येथील फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत स्वयंभु गजानन अंजनवेल संघाने महापुरुष गुहागर संघावार मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकुण 32 संघांनी सहभाग घेतला होता. Friend Circle Cricket Tournament at Khalchapat
खालचापाट येथील मैदानावर चार दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सेमी फायनल मध्ये स्वयंभु गजानन अंजनवेल विरुद्ध अबुदाबी आबलोली यांच्यात चुर्शीचा सामना झाला. त्यात अंजनवेल संघाने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या महापुरुष विरुद्ध फ्रेंड सर्कल खालचापाट यांच्यात झाला. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत चुर्शीचा झाला. यात महापुरुष संघाने 2 धावानी निसटता विजय मिळावीत फायनल मध्ये प्रवेश केला. Friend Circle Cricket Tournament at Khalchapat


अंतिम सामना स्वयंभु गजानन अंजनवेल विरुद्ध महापुरुष गुहागर यांच्यात झाला. अंतिम सामना महापुरुष संघाचा कमी स्कोर असताना अंजनवेल संघाला सोबत चुरस होत असताना ताबिष मणियार या फलंदाजाने 9 चेंडू मध्ये 12 धावा असताना दोन उत्तुंग षटकार ठोकत विजय प्राप्त केला. स्वयंभु गजानन अंजनवेल संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले. संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, षटकार किंग, अंतिम दिवसातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो ताबीश मनीयार, सर्वोत्तम गोलंदाज यश लोखंडे, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शुभम पालकर, अंतिम सामन्यातील सामनावीर ऋतिक पारदी, उगवता तारा म्हणून विघ्नेश आरेकर याची निवड करण्यात आली. Friend Circle Cricket Tournament at Khalchapat


स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, उपाध्यक्ष अनिकेत भोसले, सचिव रोहन विखारे, खजिनदार अनराज वराडकर, सुहास सुर्वे, जयदेव मोरे, निलेश मोरे, श्रीधर बागाकर, अमोद पाटील, शशिकांत शिंदे, महेंद्र वराडकर, अमोल वराडकर, रविंद्र विखारे, दशरथ आरेकर, हेमचंद्र आरेकर, वसंत आरेकर, रजनीनाथ वराडकर, सचिन बामणे, संभाजी वराडकर, विवेक मोरे, समिर पेंढारी, सुरज वराडकर, केतन गोयथळे, राज डोरलेकर, अभिजित मोरे, मयुरेश पावसकर, राज विखारे, सिद्देश पावसकर, सुयोग आरेकर, सुयोग गोयथळे, स्वप्नील पेंढारी, वैष्णव लोखंडे, मेघराज मोरे आदी उपस्थित होते. Friend Circle Cricket Tournament at Khalchapat