गुहागर, ता. 25 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २२ ते २५ डिसेंबर या चार दिवस चालणाऱ्या कै. वैभव विजय आरेकर, कै. सुधर्मा मदन आरेकर, कै. संजय सुरेश वराडकर, कै. भार्गव मारुती आरेकर, कै. विलास अनाजी वराडकर यांच्या स्मृती चषक भव्य क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. Friend Circle Art Sports Competition started


यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे यांनी दिपप्रज्वलन केले. त्यानंतर गुहागरचे माजी उपसरपंच रजनीनाथ वराडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. क्रिडांगण प्रवेशद्वारचे उद्घाटन श्री अमोल दि. वराडकर ( गुहागर तालुका भंडारी समाज न्याती अधिकारी) यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच क्रिडांगणावर नारळ वाढवून मुख्य स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांचे हस्ते करण्यात आले. चिपळूण अर्बन बँकेचे संचालक श्री. अजय खातू यांच्या हस्ते स्टॅम्पची फित सोडण्यात आली. महेंद्र वराडकर यांनी स्पर्धेला सुरुवात होणाऱ्या पहिल्या सामन्याची नाणे फेक केली. पहिला सामना महापुरुष क्रिकेट संघ विरुद्ध गुलजार वरचापाट यांच्यात झाला. Friend Circle Art Sports Competition started


यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत भोसले, सचिव रोहन विखारे, खजिनदार अनराज वराडकर, सदस्य समिर पेंढारी, सुयोग आरेकर, सोहम कनगुटकर, श्री राज विखारे, श्री सुयोग गोयथळे, श्री स्वप्निल पेंढारी, श्री हेमचंद्र आरेकर, श्री वसंत पावसकर, श्री मनोहर वराडकर, श्री दशरथ आरेकर श्री अनंत पावसकर, श्री वसंत आरेकर, श्री वसंत डेरे श्री अनिल गोयथळे, श्री संतोष मोरे, श्री नंदकुमार वराडकर आदींसह मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते. Friend Circle Art Sports Competition started