• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे मोफत शिवण वर्ग

by Manoj Bavdhankar
January 13, 2025
in Guhagar
149 1
0
Free Sewing Class at Valneshwar
292
SHARES
834
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेडिंग इन्स्टिट्यूट व वात्सल्य ट्रस्ट मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद जयंती कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मोफत शिवण वर्गाचेही आयोजन केलं होतं. यावेळी ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी श्री शरद जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  ते म्हणाले की, मानव सेवा हीच ईश्वरसेवा या विवेकानंदांच्या तत्त्वाप्रमाणे आमचा ट्रस्ट कार्य करतो. रिटायर्ड बट नॉट टायर्ड अशा अनुभव संपन्न ज्येष्ठांच्या मदतीने ग्राम विकासाचे कार्य करण्याचे ध्येय ठेवून विविध उपक्रम आम्ही राबवतो. Free Sewing Class at Valneshwar 

Free Sewing Class at Valneshwar

श्री विवेकानंद रीसर्च व ट्रेनिंग ईन्टीट्युट तसेच वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने विवीध विषयाचे ट्रेनींग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. विवेकानंद ग्रामविकास प्रकल्पाच्या अंतर्गत “समुद्र शेवाळ” एक व्यवसायाची संधी या विषयावर एक्सेल इंडस्ट्रीज च्या विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे सहयोगी, श्री भूषण जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे व समुद्राच्या काठावरील गावातील कोळी बांधवांना मासेमारीला पूरक व्यवसाय म्हणून हा कसा उपयुक्त आहे त्याचं व्यवस्थित विवेचन केलं.  Free Sewing Class at Valneshwar 

Free Sewing Class at Valneshwar

तसेच गावातील महिला बचत गटातील सदस्यांसाठी मोफत शिवण वर्गाचं आयोजन केलं होतं. श्री विवेक शेंडे, विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे प्रमुख, यांनी या शिवण वर्गाचे उद्घाटन केले. त्यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारी अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप उपयुक्त आहेत. साथ साथ चारिटेबल ट्रस्ट व आमचं विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संयुक्त विद्यमाने आपणास सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. मीहीका डिजाइनर व क्लासेसच्या संचालिका, सौ विनया भोसले यांनी शिवण वर्ग कशाप्रकारे घेणार आहेत. तुमच्या सर्व शंकांचे समाधान कसं करणार आहे त्याचं व्यवस्थित विवेचन केलं. तसेच वेळणेश्वर परीसरातील पाच गावातील गरजू पाच महिलांना एक्सेल इंडस्ट्रीज संस्थेतर्फे निम्म्या किमतीत अद्ययावत शिवण मशीन दिले जाणार आहे. शेवटी ट्रस्टचे ट्रस्टी श्री गोपाळ गोखले यांनी समारोप करून सर्व संबंधितांचे आभार मानले. Free Sewing Class at Valneshwar 

Tags: Free Sewing Class at ValneshwarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.