गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेडिंग इन्स्टिट्यूट व वात्सल्य ट्रस्ट मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद जयंती कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मोफत शिवण वर्गाचेही आयोजन केलं होतं. यावेळी ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी श्री शरद जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, मानव सेवा हीच ईश्वरसेवा या विवेकानंदांच्या तत्त्वाप्रमाणे आमचा ट्रस्ट कार्य करतो. रिटायर्ड बट नॉट टायर्ड अशा अनुभव संपन्न ज्येष्ठांच्या मदतीने ग्राम विकासाचे कार्य करण्याचे ध्येय ठेवून विविध उपक्रम आम्ही राबवतो. Free Sewing Class at Valneshwar
श्री विवेकानंद रीसर्च व ट्रेनिंग ईन्टीट्युट तसेच वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने विवीध विषयाचे ट्रेनींग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. विवेकानंद ग्रामविकास प्रकल्पाच्या अंतर्गत “समुद्र शेवाळ” एक व्यवसायाची संधी या विषयावर एक्सेल इंडस्ट्रीज च्या विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे सहयोगी, श्री भूषण जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे व समुद्राच्या काठावरील गावातील कोळी बांधवांना मासेमारीला पूरक व्यवसाय म्हणून हा कसा उपयुक्त आहे त्याचं व्यवस्थित विवेचन केलं. Free Sewing Class at Valneshwar
तसेच गावातील महिला बचत गटातील सदस्यांसाठी मोफत शिवण वर्गाचं आयोजन केलं होतं. श्री विवेक शेंडे, विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे प्रमुख, यांनी या शिवण वर्गाचे उद्घाटन केले. त्यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारी अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप उपयुक्त आहेत. साथ साथ चारिटेबल ट्रस्ट व आमचं विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संयुक्त विद्यमाने आपणास सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. मीहीका डिजाइनर व क्लासेसच्या संचालिका, सौ विनया भोसले यांनी शिवण वर्ग कशाप्रकारे घेणार आहेत. तुमच्या सर्व शंकांचे समाधान कसं करणार आहे त्याचं व्यवस्थित विवेचन केलं. तसेच वेळणेश्वर परीसरातील पाच गावातील गरजू पाच महिलांना एक्सेल इंडस्ट्रीज संस्थेतर्फे निम्म्या किमतीत अद्ययावत शिवण मशीन दिले जाणार आहे. शेवटी ट्रस्टचे ट्रस्टी श्री गोपाळ गोखले यांनी समारोप करून सर्व संबंधितांचे आभार मानले. Free Sewing Class at Valneshwar