• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांना मोफत बस सेवा

by Manoj Bavdhankar
September 15, 2024
in Guhagar
147 1
0
Free bus service on the occasion of Ganeshotsav
288
SHARES
823
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांचे आयोजन

गुहागर, ता. 15 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मोफत एस.टी. सेवा उपलब्ध करून दिली. सदरची बस गुहागर तालुक्यातील विविध ठिकाणाहून गुहागर-चिपळूण-ठाणे-विरार अशी उपलब्ध करण्यात आली असून  या मोफत एस.टी.चा गणेश भक्तांनी लाभ घेतला. Free bus service on the occasion of Ganeshotsav

गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून ही बस सोडण्यात आली. यावेळी बस चालक यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व प्रवाशांच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, कौंढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. Free bus service on the occasion of Ganeshotsav

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी गावी येण्यासाठी सुद्धा मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मोफत बस सेवेचा अनेक गणेश भक्तानी लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध केल्याने गणेश भक्तानी प्रमोद गांधी यांचे विशेष आभार मानले. Free bus service on the occasion of Ganeshotsav

Tags: Free bus service on the occasion of GaneshotsavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.