गुहागर गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांचे आयोजन
गुहागर, ता. 15 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मोफत एस.टी. सेवा उपलब्ध करून दिली. सदरची बस गुहागर तालुक्यातील विविध ठिकाणाहून गुहागर-चिपळूण-ठाणे-विरार अशी उपलब्ध करण्यात आली असून या मोफत एस.टी.चा गणेश भक्तांनी लाभ घेतला. Free bus service on the occasion of Ganeshotsav
गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून ही बस सोडण्यात आली. यावेळी बस चालक यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व प्रवाशांच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, कौंढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. Free bus service on the occasion of Ganeshotsav
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी गावी येण्यासाठी सुद्धा मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मोफत बस सेवेचा अनेक गणेश भक्तानी लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध केल्याने गणेश भक्तानी प्रमोद गांधी यांचे विशेष आभार मानले. Free bus service on the occasion of Ganeshotsav