रिगल कॉलेजच्या डीएमएलटी विभागामार्फत आयोजन
गुहागर ता. 15 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या डीएमएलटी विभागामार्फत सरस्वती विद्यामंदिर, जामसुत येथे एकदिवशीय मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. Free Blood Group Test in Jamsut


या शिबिरामध्ये प्रथम जामसूत हायस्कूलचे श्री.कदम सर यांनी डीएमएलटी विभागाच्या प्राध्यापिका स्वाती जाधव व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शृंगारतळीसारख्या ठिकाणी विविध १००% नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे कोर्स सुरु केल्याबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे आभार मानले. यानंतर महाविद्यालयातील डीएमएलटीच्या विद्यार्थ्यांनी डीएमएलटी विभागाच्या प्राध्यापिका स्वाती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती विद्यामंदिर, जामसुत येथील 145 विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासून त्यांना संबंधित कार्ड वितरित केले. रिगल कॉलेज शृंगारतळीमार्फत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. Free Blood Group Test in Jamsut


सरस्वती विद्यामंदिर, जामसुतच्या मुख्याध्यापिक सौ. डाकवे यांनी अशा शिबिराचे आयोजन केल्याबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री संजयराव शिर्के व संचालिका मा. डॉ. सुमिता शिर्के यांचे आभार व्यक्त केले. या शिबिरासाठी सरस्वती विद्यामंदिर, जामसुतचे मुख्याध्यापक ,शिक्षक व सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Free Blood Group Test in Jamsut