तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर, ता. 14 : मेडिकल कॉलेजला ऍडमिशन करून देतो, असे सांगून गुहागर चिखली मधील एका तरुणाची १३ लाखाला फसवल्याची घटना घडली आहे. याबाबत किरण संपतराव सन्मुख यांनी आपली फसवणुक झाल्याची फिर्याद गुहागर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. Fraud by claiming to give admission to the college
अधिक माहिती अशी कि, आपण मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून एमबीबीएसला आपल्या मुलाचे ऍडमिशन करून देतो, असे खोटे सांगत गुहागर तालुक्यातील चिखली येथील किरण संपतराव सन्मुख या व्यक्तीला तब्बल १३ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud by claiming to give admission to the college
या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये हिमांशु मिश्रा, जयंत मिश्रा व उमंग मिश्रा या अनोळखी पत्ता माहित नसलेल्या व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२६(२), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत करत आहेत. Fraud by claiming to give admission to the college