गुहागर, ता. 09 : तालुक्यातील असगोली येथील शाहीर श्री प्रमोद गोविंद घुमे यांना यावर्षीचा लोककला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नमन लोककला संस्था, भारत या संस्थेच्या वतीने नमन लोककलेचा प्रसार करण्याऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे नमन लोककला कार्यक्षेत्रभारत अध्यक्ष रवींद्रजी मटकर यांच्या हस्ते प्रमोद घुमे यांना देवून सन्मानित करण्यात आले. Folk Art Inspiration Award to Pramod Ghume
श्री प्रमोद गोविंद घुमे हे आदर्श नमन कलाकार आहेत. नमनाच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक परंपरा अनेक वर्ष जोपासत आहेत. नमनाची गाणी, वगाचे लेखनही करतात. तसेच अभिनय कौशल्य असल्यामुळे ते कोणतीही भूमिका सहजपणे करतात. मृदुंग वादना बरोबर गोड गळा असल्यामुळे गायन ही छान करतात. मनोरंजना बरोबर ते समाज प्रबोधन करण्याचे कार्यही करीत असतात. स्त्रीभ्रूणहत्या साक्षरता स्वच्छता आरोग्य व्यसनमुक्ती या विषयासंबंधी जागृती करण्याचे मोलाचे कार्य नमनाच्या माध्यमातून करीत आहेत. लेखक कवी वादक गायक व अभिनय असे विविध गुण असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री घुमे आहेत. Folk Art Inspiration Award to Pramod Ghume
या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, भा ज पा तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, कलगीतुरा समन्वय समिती अध्यक्ष अभय दादा सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ कलावंत दत्ताराम आयरे, हास्यजत्रा मालिकेतील कलाकार ओमकार भोजने, आदिती ताई देशपांडे, पवार साहेब, झराजी वीर, विनायक खानविरकर, मोहन पाडावे हे मान्यवर उपस्थित होते. Folk Art Inspiration Award to Pramod Ghume