• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विमानाच्या धडकेत ३९ फ्लेमिंगो मृत्युमुखी

by Guhagar News
May 23, 2024
in Maharashtra
125 2
0
Flamingo dies in plane crash
246
SHARES
704
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

घाटकोपरमध्ये दुर्दैवी घटना

मुंबई, ता. 23 : मुंबई विमानतळावर उतरत असलेल्या एका विमानाची धडक लागून तब्बल ३९ फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याची ही पहिलीच घटना आहे. राज्याच्या वन विभागाने याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. Flamingo dies in plane crash

राज्याच्या कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे. घटनेची माहिती समजताच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहोचले. एकूण ३९ मृत फ्लेमिंगो वन विभागाने ताब्यात घेतले. मृत फ्लेमिंगो पक्षी ऐरोली येथील वन विभागाच्या किनारी व सागरी जैवविविधता केंद्रात नेण्यात आले आहे. या घटनेचा तपास कांदळवन विभागाचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक विक्रांत खाडे करीत आहेत. Flamingo dies in plane crash

मुंबई विमानतळावर विमाने उतरताना घाटकोपर परिसरातून जातात. त्यामुळे ही विमाने अतिशय कमी उंचीवरून उडत असतात त्यावेळी लँडिंगच्या वेळेला विमानाची धडक लागून फ्लेमिंगोंच्या या थव्यांचा मृत्यू झाला आहे. Emirat कंपनीच्या विमानाची धडक बसताच प्लेमिंगोंच्या शरीराचे तुकडे व पिसे घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर, पंतनगर परिसरात आकाशातून पडली. रात्री ८.४० च्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात नेमका कसा घडला ?, विमान कोणते होते ?ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. Flamingo dies in plane crash

नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण महासंचालकांकडे याबाबत तक्रार केली आहे. विमान उतरत असताना वैमानिकाला रडारवर फ्लेमिंगोच्या थव्याचे अस्तित्व जाणवले नाही का ?, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली. Flamingo dies in plane crash

Tags: Flamingo dies in plane crashGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet62
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.