आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते लोकार्पण
गुहागर, ता. 28 : आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर आगारासाठी मंजूर केलेल्या एकूण दहा गाड्यांपैकी नविन पाच एस्.टी.बस प्रवाशांच्या सेवेसाठी गुहागर आगार येथे दाखल झाल्या आहेत. आज आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. एव्हडेच नव्हे तर आ. जाधवांनी स्वतः बसचे स्टेरिंग हातात घेऊन प्रवाशांसह आपल्या कार्यकर्त्यांना नव्या बस मधून फेरफटका मारला. Five new ST Bus entered in Guhagar Agar


या कार्यक्रमासाठी उबाठा शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, गुहागर पंचायत समिती माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, गुहागर पंचायत समिती माजी सभापती सुनील पवार, विलास वाघे, राजेंद्र आरेकर पिंट्या संसारे, सचिन जाधव, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, कृपा हेअर टॉनिकचे मालक राजन दळी, प्रशांत विचारे, गुहागर शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, राज विखारे, प्रवीण प्रकाश रहाटे, पारिजात कांबळे आदी उपस्थित होते. Five new ST Bus entered in Guhagar Agar


यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते नवीन एसटीच्या गाड्यांचे पूजन करण्यात आले. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी एसटीच्या नवीन गाडी मध्ये बसून गुहागर आगाराच्या आवारात एसटी चालवण्याचा आनंद घेतला. तसेच आ. जाधव व सर्व कार्यकर्त्यांनी गुहागर एसटी स्टँड ते मोडका आगर पर्यंतचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान अनेक गमती जमती त्यांनी कार्यकर्त्याना सांगितले. Five new ST Bus entered in Guhagar Agar

