मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम
गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु शालेय मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे वाटप व त्यांच्या आईंना साडी, चोळी वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सिध्दीविनायक विद्यामंदिर, मुंढर येथे संपन्न झाला. Financial help to poor, needy students
चिपळूण तालुक्यातील ओमळी, नारदखेरकी, देवखेरकी, निर्व्हाळ, रावळगाव, उमरोली, कौंढरताम्हाने, बामणोली, बोरगाव, गुहागर तालुक्यातील चिखली, काळसूरकौंढर, मुंढर, अंजनवेल, रानवी, धोपावे, दाभोळ, पवारसाखरी, साखरी बुद्रुक आदी गावांतील मुलींचा या उपक्रमात समावेश आहे. एकूण ८१ मुलींना प्रत्येकी २ हजाराचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाला गुहागर दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, संतोष मावळगकर, नीलम गोंधळी, सौ. विनिता नातू, श्री मालप, प्रतिष्ठाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. Financial help to poor, needy students