रत्नागिरी, ता. 09 : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयास शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. वाङ्मय मंडळाअंतर्गत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या शैक्षणिक अभ्यासाचा एक भाग म्हणून केले. या वेळी विद्यार्थ्यांनी वाचनालयामधील कार्यपद्धती, पुस्तकांच्या वर्गीकरणाची प्रक्रिया आणि वाचनालयाचा सर्वांगीण उपयोग, वाचनाचे महत्व आणि संशोधन प्रक्रियेतील वाचनालयाच्या योगदान जाणून घेतले. Field visit of Dev College students to the library
क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या विविध विभागांबद्दल माहिती देण्यात आली. ग्रंथपाल सौ. मीनल हळदणकर व सौ. मानसी मराठे, इतर सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथसंपदा, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, ई- बुक्स आणि डिजिटल संसाधनाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील वर्गीकरण पद्धती जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन आणि संशोधनासाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध पुस्तकांचा असलेल्या सुविधांची पाहणी केली. विषयांवरील पुस्तके पाहिली. डिजिटल संसाधनाचा वापर कसा करायचा हे शिकले. विशेष म्हणजे वाचनालयातील डिजिटल ई पुस्तक प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीचा अनुभव घेतला. इंटरनेटद्वारे उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधन साधनांचा उपयोग करून घेतला. Field visit of Dev College students to the library
भाषेच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयींच्या फायद्यावर मार्गदर्शन केले. वाचनालयातील कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या संवादाने विद्यार्थ्यांना वाचन संशोधन आणि लेखन या क्षेत्रात नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली. वाचनालयात उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा शैक्षणिक जीवनात महत्त्वपूर्ण उपयोग कसा होऊ शकतो, हे स्पष्ट केले. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे आधुनिक जगाप्रमाणे अपडेट असल्यामुळे व सर्व सुविधा पाहून खूप आनंद व्यक्त केला. Field visit of Dev College students to the library
क्षेत्रभेटीस प्र. प्राचार्या मधुरा पाटील, प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. गौरी बोटके आणि प्रा. वीणा कोकजे उपस्थित होत्या. या मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे कला शाखेचे सर्व विद्यार्थी, प्रथम वर्ष विज्ञान शाखेचे इंग्रजी विषयांचे विद्यार्थी सहभागी झाले. भेटीसाठी वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर, ग्रंथपाल यांचे सहकार्य लाभले. Field visit of Dev College students to the library