• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाचाल तर वाचाल’ संदेश आजही तितकाच प्रेरणादायी

by Mayuresh Patnakar
July 31, 2026
in Ratnagiri
135 1
0
Felicitation ceremony in Chiplun
265
SHARES
758
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुप्रसिद्ध लेखिका सौ.संध्या साठे-जोशी यांचे प्रतिपादन

गुहागर, ता. 31 : इंटरनेटच्या वेगवान युगात विद्यार्थ्यांना विचारांची स्थिरता, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाची समृद्धी मिळवून द्यायची असेल, तर वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक आहे. वाचाल तर वाचाल’ हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध लेखिका सौ.संध्या साठे-जोशी यांनी येथे केले. येथील विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण यांच्या वतीने बुधवारी दिनांक २९ जूलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ग्रंथालयाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थीनीचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. Felicitation ceremony in Chiplun

या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रंथपूजन व गुरूपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्ञान, संस्कार आणि वाचनसंस्कृतीचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका सौ.संध्या साठे-जोशी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. त्यानंतर ग्रंथालयाची माहिती सांगताना डॉ. माधव सोमण म्हणाले की, “ग्रंथालय म्हणजे ज्ञानयज्ञ असून ग्रंथ हेच आपल्या आयुष्यातील अक्षय गुरू आहेत,” असे सांगत ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित केले. पूर्वाश्रमीच्या घरडा वाचनालयाला नवसंजीवनी देत त्याचे आधुनिक विभा अरविंद ग्रंथालयात रूपांतर करण्यासाठी  सुप्रसिद्ध डॉ. यतिन जाधव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे व दिलेल्या भरीव योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले. Felicitation ceremony in Chiplun

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री.बापूसाहेब काणे म्हणाले, “गुरू हेच जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असतात. भगवान श्रीकृष्णांनाही सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गुरूकडून शिक्षण घ्यावे लागले. गुरूंचे स्थान जीवनात सर्वोच्च आहे.” यावेळी कु.सई यतिन जाधव , कु. रिकीता मंगेश वेस्वीकर (एमबीए), कु. निहार उमेश  काटकर(एम. टेक), कु. संस्कृती उदय ओतारी(एल एल बी), कु. स्नेहल शिला ओतारी(एल एल बी), कु. रोशनी महेश विंचू( एल एल बी), कु. आर्या प्रकाश कदम( एम बी बी  एस)आणि कु. मानसी मनेश म्हापदी (एम बी बी एस)या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. Felicitation ceremony in Chiplun

कार्यक्रमास ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.बापूसाहेब काणे, कार्यवाह श्री .विजय कदम, संचालक श्री.प्रसाद रिसबूड, सौ.मेधा बेटकर, श्री.प्रकाश गांगण, श्री. सुहास चव्हाण, कोषाध्यक्ष श्री. विनायक ओक तसेच श्री.प्रकाश घायाळकर, श्री.अनिल धोंडये सौ.मुग्धा मोरे, ग्रंथपाल कु. सुप्रिया खोत,सौ. पूर्वा  कांबळी आदी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक आणि वाचनप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Felicitation ceremony in Chiplun

Tags: Felicitation ceremony in ChiplunGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share106SendTweet66
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.