रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर कायमस्वरूपी नोकरीत
गुहागर, ता. 19 : गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेच्या जीवाशी खेळणाऱ्या व सेवेतील कामकाज वेळेमध्ये आपल्या खाजगी दवाखान्यात व्यस्त असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. मात्र, त्याच वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशासनाने कायमस्वरूपी सेवेत घेतल्याने असगोली येथील राहुल कनगुटकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत १ एप्रिल रोजी पासून गुहागर ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. Fasting in front of rural hospital
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक ढेरे व सौ गीता ढेरे यांनी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल झालेल्या सामान्य महिलेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. आपल्या सेवेतील कामकाज वेळेमध्ये शृंगारतळी येथील आपले खाजगी दवाखाना सांभाळणारे डॉक्टर शशांक ढेरे यांनी स्वतः ऐवजी त्यांची पत्नी सौ गीता ढेरे यांना गुहागर ग्रामीण रुग्णालयात सेवेत ठेवले. परिणामी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारा करता आलेल्या सामान्य महिलेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न त्यावेळी केला गेला होता यावर आपण तक्रार केल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे गुहागर ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक यांनी कळवले होते. यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांनी आपला राजीनामा सादर केला असल्याचेही कळवण्यात आले होते. असे असताना डॉक्टर शशांक ढेरे यांना १५ मार्चपासून गुहागर ग्रामीण रुग्णालयात कायम सेवेत घेण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली. Fasting in front of rural hospital
यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या व जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले असल्याच येथील वैद्यकीय अधीक्षकांकडून समजले. यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी राजीनामा दिलेला असतानाही त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्याला सेवेमध्ये कायम करुन एक प्रकारे बक्षीस देण्यात आले आहे. या सर्व प्रकारामध्ये सामान्य रुग्णाना व नागरीकांना योग्य न्याय मिळुन जो पर्यंत संबंधीत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत आपले स्थानिक कार्यालय म्हणून ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे मी व माझे अन्य सहकारी अमित चंद्रकांत कनगुटकर, विवेक प्रभाकर पिळणकर, सौ. प्रिया भारतभूषण किर, मिलिंद चंद्रकांत कनगुटकर सोमवार दि. १ एप्रिल २०२४ पासुन बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. Fasting in front of rural hospital