बॅंक ऑफ इंडिया आबलोली शाखेचा कारभार न सुधारल्यास उपोषण
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठत आजू बाजूच्या २०-२५ गावातील लोक बाजार रहाटासाठी आणि औषधोपचाराठी व शासकीय कामांसाठी येत असतात महत्वाचा मुद्दा असा आहे की, या गावात पतसंस्था व अनेक बॅंका आहेत तेथे ग्राहकांना सन्मानाची वागणूक दिली जाते तसेच आबलोली गावात बॅंक ऑफ इंडिया शाखा आबलोली हि शासकीय बॅंक सुद्धा आहे पण या बॅंकेत इंटरनेट सुविधा गायब असल्याने दूर पल्ल्यावरुन आलेल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते तसेच कर्मचाऱ्यांचे उद्दट व उर्मट बोलणे ऐकून घ्यावे लागते पदरी निराशाच येते केवायसी करण्यासाठी दोन – दोन महिने लागतात यात वेळ व पैसा वाया जातो. Fast to death of Aabloli villagers


अशा तक्रारी ग्रामस्थ घेऊन आल्यावर याची गंभीर दखल घेऊन आबलोलीतील सामाजिक कार्यकर्ते श्री.यशवंत(दादा) पागडे, सचिन कारेकर, पोलिस पाटील महेश भाटकर, प्रमेय आर्यमाने, उपसरपंच अक्षय पागडे, सुभाष काजरोळकर, राजेंद्र कारेकर यांनी बॅंक ऑफ इंडिया शाखा आबलोलीचे शाखा अधिकारी श्री.पी.व्हि.सिन्हाराव यांची भेट घेऊन बॅंकेच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी सांगितले. यात बदल नाही झाला तर ग्रामस्थां समवेत १५ ऑगस्टला तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण छेडणार असा गंभीर इशारा दिला आहे. या विषयी बॅंक ऑफ इंडिया शाखा आबलोलीचे शाखा अधिकारी श्री. पी.व्हि.सिन्हाराव यांनी यापुढे सुरळीत कारभार चालेल असा शब्द दिला आहे. Fast to death of Aabloli villagers