रत्नागिरी, ता. 14 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्त पुण्याच्या मणिलाल नानावटी व्होकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फॅशन शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत झाला. सात संकल्पनांवर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये विद्यार्थिनींनी शो सादर केला. प्रथमच रेझिन आर्ट तंत्राचा वापर करून कापडावर नवनवीन नमुने साकारले. ब्रूचेस बाय द ब्रूक, स्कायबॉन्ड रिव्हायव्हल, ब्लॉसमिंग ग्रेस, फ्रोझन एलेगन्स, विंग्स ऑफ ग्लॅमर अॅक्वा अरोरा आणि या थिमवर आधारित फॅशन शो सादर झाला. Fashion show based on the concept of nature
ब्रूचेस बाय द ब्रूक या कलेक्शनमध्ये किंगफिशर बर्डपासून प्रेरणा घेऊन, बर्डमधल्या चमकदार रंगाचा वापर केला. रेडियन्ट ब्लू, फायरी ऑरेंज आणि काम पीच कलरचा वापर केला. हे कलेक्शन रिसॉर्ट वेअर या कॅटेगरीमध्ये येते. ए लाईन सीलूएट्स, नैसर्गिक फॅब्रिक्सचा वापर करून कपड्याना लक्झरीअस आणि ग्लॅमरस लुक देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी सुंदरता वाढवण्यासाठी मोती व एम्ब्रॉडरीच्या धाग्यांनी सुशोभित केले. Fashion show based on the concept of nature


स्कायबॉन्ड रिव्हायव्हल हे कलेक्शन पुनर्वापर किंवा सस्टनेबिलिटी यावर आधारित होते. यात वापरलेल्या डेनिमस व लेस कापडाचा वापर केला होता. त्या गारमेंट्सचा लुक वाढवण्यासाठी त्यामध्ये फॅब्रिक पेंटिंग, फ्रेंच नॉट एम्ब्रॉयडरी आणि मोत्यांचा वापर केला. शैली आणि सर्जनशीलतेचे मिश्रण यात पाहायला मिळाले. Fashion show based on the concept of nature
ब्लॉसमिंग ग्रेस या कलेक्शनची प्रेरणा हे लिली फुल होते. जे शुद्धता आणि सुसंस्कृतता दर्शवते. कार्यालयीन पोशाखासाठी याचा उपयोग केला जातो. ओम्ब्रे डायिंग, फॅब्रिक पेंटिंग व रिबन वर्क एम्ब्रॉयडरीचा वापर यात केला. त्याचबरोबर त्याची सुंदरता वाढवण्यासाठी नाजूक मोती व पाईप्स म्हणजेच कटदाण्याचा वापर केला होता. गारमेंट्सचा लुक पूर्ण करण्यासाठी त्यांनी केप्स चा वापर केला जो महिला सक्षमीकरण दर्शवते. Fashion show based on the concept of nature


फ्रोझन एलेगन्स या कलेक्शनमध्ये पारंपरिक आणि नावीन्य पूर्ण डिझायनिंगचा वापर केला होता जो आपल्या संस्कृतीला जपतो. यात शिल्पकला, नाजूक काढणी आणि आकर्षक डिझाइन यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. या कलेक्शन मध्ये सूती कापड, रेशीम आणि अन्य प्रीमियम फॅब्रिकवर धाग्यांची नाजूक एम्ब्रॉयडरी, कट पाइप आणि स्टोन वापरून केलेली कलात्मक सजावट लक्ष वेधून घेत होती. Fashion show based on the concept of nature
विंग्स ऑफ ग्लॅमर हे कलेक्शन पॉवर आणि पॅशन दर्शवते. उत्तर अमेरिकेतील सुंदर आणि तेजस्वी नॉर्दन कार्डिनल पक्ष्याच्या मोहक सौंदर्याने प्रेरित, जसे निसर्गात कार्डिनल आपल्या तेजस्वी लाल पंखांनी उठून दिसतो, तसेच हे कपडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मंत्रमुग्ध करण्यासाठी तयार केले. या कलेक्शनमध्ये पंखांची आकर्षक शिल्पकला, बीड्स आणि पाइप एम्ब्रॉयडरीचा वापर एक अत्यंत नाजूक आणि ग्लॅमरस प्रभाव तयार करतो. Fashion show based on the concept of nature


अॅक्वा अरोरा हे कलेक्शन फ्लुइड ब्युटी ऑफ वॉटर म्हणजे वाहत्या पाण्यावरून प्रेरित होऊन बनविण्यात आले होते. या डिझाइन्समध्ये विद्यार्थिनींनी पाण्याची प्रत्येक हालचाल पकडली. ज्यामध्ये त्यांनी फ्लोवी फॅब्रिक्सचा वापर केलेला, जो पाण्याच्या लाटांपासून प्रेरित होता, गाउनचा लुक वाढविण्याकरिता चमकदार मोती आणि रेसिन आर्टचा उपयोग केला. निळ्या आणि आकाशी रंगांच्या हळूहळू संक्रमणाने एक सुंदर आणि सौम्य परिणाम साधला गेला. रेझिन कला आणि शिमर सरफेसच्या जोडणीने या पोशाखांना एक अलौकिक आणि आकर्षक लुक दिला गेला. Fashion show based on the concept of nature
नॉर्दन मिस्टिक हे कलेक्शन नोरथर्न लाईटपासून प्रेरित होऊन बनविण्यात आले होते. नॉर्दन लाईट्स ज्याला उत्तरीय प्रकाश असेही म्हटले जाते, हे एक नैसर्गिक प्रकाश प्रदर्शन आहे जे मुख्यतः उत्तर ध्रुवाच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये दिसते. हे सूर्याच्या चार्ज केलेल्या कणांच्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संवाद साधल्यामुळे तयार होतात. सूर्यापासून आलेले कण पृथ्वीच्या वायुमंडळातील वायूच्या अणूंशी भिडतात, ज्यामुळे त्या अणूंमध्ये ऊर्जा संचारित होते आणि ती ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर पडते. हा प्रकाश विविध रंगांमध्ये दिसतो, सर्वात सामान्य रंग हिरवा असतो, पण कधीकधी लाल, जांभळा, पिवळा, आणि निळा रंग देखील दिसू शकतो. आणि याच रंगांचा वापर करून विद्यार्थिनींनी सुंदर प्रकारे त्यांच्या पोशाखात डिजिटल डिजाईन प्रिंट्स, कॉर्सेटस व नवीन ड्रेपिंग टेकनिक्स चा वापर करून त्याला पूर्णत्व दिले. Fashion show based on the concept of nature
जोगळेकर, प्रभूंनी केले कौतुक
या शोसाठी गारमेंट कलेक्शनचे मार्गदर्शन शिवानी जोशी व भाग्यश्री दाबके यांनी केले. शिवानी अरसुल यांनी उत्तम सुत्रसंचालन केले. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नानावटी इन्स्टिट्यूटच्या संचालिका माधवी शिंदे व फॅशन डिझाईन डिपार्टमेंटच्या प्रमुख पूजा दरेकर या वेळी उपस्थित होत्या. या समारंभासाठी ६०० हून अधिक रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. विशेष अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. संपदा जोगळेकर आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले.


फॅशन शोमध्ये स्नेहा धावडे, तृप्ती खोपडे, योगिता विटकर, गौरी मोरे, हिमाली मैंद, दिव्या साळवी, सायली हागरे, अपूर्वा बुडगे, अंजली भुतकर, साक्षी मोहोळ, अक्षता गोने, साक्षी शेळके, शिल्पा वायकर, प्राप्ती गायकवाड, पायल सदाफुले, वैष्णवी बराटे, प्राजक्ता पवार, सिद्धी पळसकर, साक्षी निगुसकर, दिव्या राजपूत, नमो रांका, प्राजक्ता जोरी, श्रुती पवार, ऐश्वर्या शिरीष सुर्यवंशी, सायली चव्हाण, निकिता दोरगे, तृप्ती ढोबळे आणि अमृता धुमाळ यांनी सहभाग घेतला. Fashion show based on the concept of nature