गुहागर, ता. 28 : पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या 64 वी जनरल सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेमध्ये गावातील दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड तसेच भाजीपाल्याचे उत्पादन करून सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. Farmers felicitated by Patpanhale Society
या सर्वसाधारण सभेमध्ये सुमारे 111 सभासद उपस्थित होते. तालुक्यामध्ये एक मोठी सोसायटी असून या ठिकाणी शेतकऱ्यांना अल्पमुदत व मध्यम मुदत कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खतांची मागणी करून वाटप केले जाते. इतर बँकांप्रमाणेच या ठिकाणी ठेवीही ठेवल्या जातात. या विविध कार्यकारी सोसायटीचे कामकाज ही उत्कृष्ट व कौतुकास्पद होत आहे. Farmers felicitated by Patpanhale Society
या जनरल सभेमध्ये अनंत गावडे, संकेत रावणंग, महेंद्र गावडे, सुनील गावडे, प्रवीण गावडे, विलास पागडे, नितेश पागडे, विजय पागडे, संजय भेकरे यांचा सोसायटीतर्फे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी शेतीकडे वळावे व जास्तीत जास्त शेती करावी, आपल्या सोसायटीकडून आपल्याला शक्य तेवढे सहकार्य असेल असे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मयू कोळवणकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेले या सोसायटीचे सभासद व पाटपन्हाळे गावाचे नवनिर्वाचित महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण यांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये विनायक जोशी सचिव यांनी संपूर्ण वर्षाचा जमा खर्च व ताळेबंद वाचून दाखवला. Farmers felicitated by Patpanhale Society