• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवी येथील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अर्णव हळदणकर प्रथम

by Guhagar News
October 19, 2024
in Guhagar
188 2
2
Fancy dress competition at Hedavi
369
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19: तालुक्यातील हेदवी केळपाट आळी येथे  नवरात्रोत्सवानिमित्त  मंडळाच्यावतीने शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. यावेळी ग्रुप फॅन्सीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. Fancy dress competition at Hedavi

सदर स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये तृतीय क्रमांक वारकरी कु.अद्विक सुधीर हळदणकर, द्वितीय क्रमांक हनुमान कु. कौशिक नाटुस्कर व प्रथम क्रमांक श्रावण बाळाची भूमिका ज्याने उत्तमपणे निभावली तो कुमार अर्णव तारेश हळदणकर  तर उत्तेजनार्थ गाडगे महाराज कुमार कौशल्य गावणग यांची निवड करण्यात आली. तसेच मोठ्या गटामध्ये तृतीय क्रमांक जिजामाता कुमारी आकांक्षा हेदवीकर, द्वितीय क्रमांक परशुराम कुमार नरेश दंणदणे तर प्रथम क्रमांक नागा साधू कुमार रोशन माटल यांनी पटकावले. Fancy dress competition at Hedavi

या ग्रुप फॅन्सी मध्ये भोंदू बुवा सोहंम मास्कर आणि ग्रुप यांनी उत्तम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला. या विजेत्यांना मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री विनायक अवेरे, श्री संदीप कांबळे, श्री तारेश हळदणकर व श्री पारस भुवड यांनी काम पाहिले. सदर बक्षीस वितरणाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष वसंत आग्रे, युवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पागडे तर महिला मंडळाचे अध्यक्ष शैलाताई देसाई आणि गावातील मे प्रतिष्ठा नागरिक उदय भाई जाधव हे उपस्थित होते. शेवटी मंडळाच्यावतीने सर्व कलाकारांना व दांडिया प्रेमींना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Fancy dress competition at Hedavi

Tags: Fancy dress competition at HedaviGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share148SendTweet92
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.