• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द

by Guhagar News
December 2, 2024
in Maharashtra
396 5
0
Fake ration card cancelled
779
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर देशासाठी घातक बनत आहेत. ते केवळ बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करून काम करत नाहीत, तर स्वत:ला या देशाचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार आणि मतदार कार्डसारखी बनावट कागदपत्रे बनवत आहेत. यासाठी त्यांनी मृत झालेल्या व्यक्तींची ओळख घेण्यास सुरुवात केली आहे. Fake ration card cancelled

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर भारतातील विविध राज्यांमध्ये लपून बसले आहेत आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी मरण पावलेल्या लोकांची ओळखपत्रे वापरत आहेत. हे घुसखोर या नावांनी आपला धंदा तर चालवत आहेतच पण बँकांमध्ये खाती देखील उघडली आहेत. एवढेच नाही तर, या बनावट कागद पात्रांचा वापर करून हीच घुसखोर जनता वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहे. डिजिटलायझेशन ड्राइव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) बरेच बदल झाले असून ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. Fake ration card cancelled

देशभरातील रास्त भाव दुकानांमध्ये ५.३३ लाख ई-पीओएस उपकरणे बसवण्यात आली आहेत. याद्वारे धान्य वितरणादरम्यान आधारद्वारे पडताळणीसह योग्य व्यक्तीपर्यंत रेशनचे वाटप करण्यात येत आहे. मंत्रालयाने सांगितले की, ‘आज एकूण धान्यांपैकी सुमारे 98 टक्के धान्य आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहे. यामुळे गैर-पात्र लाभार्थी दूर करण्यात आणि काळाबाजार कमी करण्यात मदत झाली आहे. यामुळे सिस्टीममधील बनावट कार्ड आणि चुकीच्या नोंदी नष्ट करताना खऱ्या लाभार्थ्यांना वितरण सुनिश्चित केले आहे. Fake ration card cancelled

Tags: Fake ration card cancelledGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share312SendTweet195
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.