तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई, ता. 06 : मुंबईत आझाद मैदानावर आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तिघांना शपथ दिली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सितारामण तसेच विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. Fadnavis took oath as Chief Minister
देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून एनडीएचे नेते मुंबईत दाखल झाले होते. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड कलावंतांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंह यांची खास उपस्थिती होती. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सपत्निक उपस्थित होता. उद्योगजगतातून रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, त्यांचे बंधू अनिल अंबानी, एचडीएफसीचे दीपक पारेख शपथविधीला उपस्थित होते. Fadnavis took oath as Chief Minister
शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून साधु, संत, विविध संप्रदायांचे प्रमुखही उपस्थित होते. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक विधानसभेतील भाजप कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. दुपारी 2 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी टर्मिनसवर विविध भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. भारतमाता की जय, वंदेमातरम, याबरोबर एक है तो सेफ है च्या घोषणा देत हे कार्यकर्ते शपथविधी सोहळ्याला आझाद मैदानात जात होते. शपथविधी सोहळा स्थानी मुख्य सभामंडप आणि व्यासपीठाशेजारी दोन स्वतंत्र मंडप उभारण्यात आले होते. यातील एका व्यासपीठावर साधुसंताची बैठक व्यवस्था होती. तर दुसऱ्या व्यासपीठावरुन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. कैलाश खेर, अजय अतुल, यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी गाणी सादर केली. Fadnavis took oath as Chief Minister
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर महाराष्ट्रातील जनता प्रचंड प्रेम करते हे शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने दिसून आले. सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्यासपीठावर आसनस्थ होत होते. त्यावेळी उपस्थित जनता शांत होती. परंतु योगी आदित्यनाथ यांनी व्यासपीठावर प्रवेश करताच एकच गलका झाला. योगींनी दिलेली घोषणा उत्स्फुर्तपणे सभागृहातून उमटली. हे प्रेम पाहून योगी आदित्यनाथ यांनीही जनतेला पुन्हा अभिवादन केले. अशाच पध्दतीचा जल्लोष पंतप्रधान नरेंद मोदी, सचिन तेंडुलकर यांच्यासह काही सिने कलावंतान आल्यावर उपस्थितांनी केला. Fadnavis took oath as Chief Minister
काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात फक्त तीन नेत्यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर सर्वात शेवटी अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी शिंदे यांनी शिवसेनेचे संस्थापक, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव उच्चारून शपथेला प्रारंभ केल्याचे दिसून आले. यावेळी नेमकी कधी शपथ सुरू करायची याबाबत राज्यपाल महोदय काही थांबून राहिले होते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. दरम्यान, या सोहळ्याचा राज्यातील विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. Fadnavis took oath as Chief Minister